9 December

0
176

९ डिसेंबर – घटना

१७५३: थोरले माधवराव पेशवे यांचा रमाबाई यांच्याशी विवाह झाला

१८९२: इंग्लिश फुटबॉल क्लब न्यूकॅसल युनायटेडची स्थापना झाली

१९००: अमेरिकेतील सर्वधर्म परिषदेत भाग घेऊन स्वामी विवेकानंद भारतात मुंबईमध्ये परतले.

१९००: डेव्हीस कप टेनिस स्पर्धेची सुरवात.

१९४६: दिल्लीमध्ये घटना परिषदेची पहिली बैठक.

१९६१: पोर्तुगीज यांच्या ताब्यात असलेले दिव व दमण हे प्रांत भारतात समाविष्ट केले.

१९६१: ब्रिटन पासुन स्वतंत्र होऊन टांझानिया देशाचा जन्म.

१९६६: बार्बाडोसचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.

१९७१: संयुक्त अरब अमिरातींचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.

१९९५: बारामती-पुणे थेट रेल्वेचा शुभारंभ.

९ डिसेंबर – जन्म

१५०८: डच गणिती आणि नकाशे तज्ञ गेम्मा फ्रिसियस यांचा जन्म.

१६०८: कवी विद्वान आणि मुत्सद्दी जॉन मिल्टन यांचा जन्म. (मृत्यू: ८ नोव्हेंबर १६७४)

१८६८: नायट्रोजनपासून मोठ्या प्रमाणावर अमोनिआ वायू मिळवण्याची पद्धत शोधल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन रसायनशास्त्रज्ञ फ्रिटझ हेबर यांचा जन्म. (मृत्यू: २९ जानेवारी १९३४ – बाझेल, स्वित्झर्लंड)

१८७८: कोल्हापूर संस्थानचे दिवाण व शिक्षणमंत्री अण्णासाहेब लठ्ठे यांचा जन्म. (मृत्यू: १६ मे १९५०)

१८७०: भारतीय डॉक्टर आणि मिशनरी आयडा एस स्कडर यांचा जन्म. (मृत्यू: २३ मे १९६०)

१९१९: केरळचे मुख्यमंत्री ई. के. नयनार यांचा जन्म.

१९४५: चित्रपट अभिनेते आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा यांचा जन्म.

१९४६: कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी उर्फ अँटोनिया एडवीज अल्बिना मैनो यांचा जन्म.

१९४६: जन्माने इटालियन असलेल्या भारतीय राजकारणी सोनिया गांधी यांचा जन्म.

१९८१: अभिनेत्री दिया मिर्झा यांचा जन्म.

९ डिसेंबर – मृत्यू

१९४२: हिंदी-चीनी मैत्रीचे प्रतिक डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर १९१०)

१९९३: चित्रपट अभिनेत्री स्नेहप्रभा प्रधान यांचे निधन.

१९९७: कन्नड लेखक, चित्रपट निर्माते आणि विचारवंत तसेच ज्ञानपीठ पारितोषिक विजेते, पद्मभूषण आणि साहित्य अकादमी अवॉर्ड विजेते के. शिवराम कारंथ यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर१० ऑक्टोबर १९०२ – कोटा, दक्षिण कन्नडा, कर्नाटक)

२०१२: बारकोडचे सहनिर्माते नॉर्मन जोसेफ वोंडलँड यांचे निधन. (जन्म: ६ सप्टेंबर १९२१)