9 October

0
171

९ ऑक्टोबर – घटना

१४१०: प्राग खगोलशास्त्रीय घडामोडींचा प्रथम उल्लेख करण्यात आला.

१४४६: हंगुल वर्णमाला कोरिया मध्ये प्रकाशित झाली.

१८०६: पर्शिया ने फ्रान्सविरुद्ध युद्ध पुकारले.

१९६०: विद्याधर गोखले यांच्या पंडितराज जगन्नाथ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.

१९६२: युगांडा देशाला युनायटेड किंग्डमकडून स्वातंत्र्य मिळाले.

१९८१: फ्रान्समधे मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करण्यात आली.

९ ऑक्टोबर – जन्म

१७५७: फ्रान्सचा राजा चार्ल्स (दहावा) यांचा जन्म. (मृत्यू: ६ नोव्हेंबर १८३६)

१८५२: रासायनिक प्रक्रियेद्वारे शर्करा रेणूंच्या निर्मितीसाठी १९०२ मध्ये नोबेल पुरस्कार मिळालेले जर्मन रसायनशास्त्रज्ञ एमिल फिशर यांचा जन्म. (मृत्यू: १५ जुलै १९१९)

१८७६: बौद्ध धर्माचे अभ्यासक पंडित धर्मानंद कोसंबी यांचा जन्म. (मृत्यू: ४ जून १९४७)

१८७७: ओरिसातील समाजसुधारक, सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्यसेनानी, कवी व लेखक पण्डित गोपबंधूदास तथा उत्कलमणी यांचा जन्म. (मृत्यू: १७ जून १९२८)

१८९७: मद्रास राज्यचे ६वे मुख्यमंत्री एम. भक्तवत्सलम यांचा जन्म. (मृत्यू: १३ फेब्रुवारी १९८७)

१९०६: सेनेगल देशाचे पहिले राष्ट्रपती लेओपोल्ड सेडर सेघोर यांचा जन्म. (मृत्यू: २० डिसेंबर २००१)

१९२४: भारतीय सैनिक इमानुवेल देवेन्द्रर यांचा जन्म. (मृत्यू: ११ सप्टेंबर १९५७)

१९६६: इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरुन यांचा जन्म.

१९६६: प्लाझा मॅगझीनचे संस्थापक क्रिस्टोफर ओस्टलंड यांचा जन्म.

९ ऑक्टोबर – मृत्यू

१८९२: पत्रकार, समाजसुधारक व इतिहासकार रावबहादूर गोपाळ हरी देशमुख यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी १८२३)

१९१४: बालवाङ्‌मयकार विनायक कोंडदेव ओक यांचे निधन. (जन्म: २५ फेब्रुवारी १८४०)

१९५५: हार्मोनियम वादक, अभिनेते व संगीतकार, नाट्यसंगीताचे पहिले शिल्पकार, पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक, संगीत क्षेत्रातील पहिले सौंदर्य मीमांसक, संगीतिकांचे प्रवर्तक गोविंदराव टेंबे यांचे निधन. (जन्म: ५ जून १८८१)

१९८७: कथकली नर्तक गुरू गोपीनाथ यांचे निधन. (जन्म: २४ जून १९०८)

१९९८: छायालेखक (Cinematographer) जयवंत पाठारे यांचे निधन.

१९९९: नारद मुनींच्या भूमिकेद्वारे नाट्यरसिकांच्या सदैव स्मरणात असलेले रंगभूमीवरील रंगकर्मी मा. अनंत दामले तथा नूतन पेंढारकर यांचे निधन.

२०००: व्हिक्टोरिया क्रॉस प्राप्त इंडियन-स्कॉटिश कर्नल पॅट्रिक अँथनी पोर्टिअस यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९१८)

२००६: भारतीय वकील आणि राजकारणी कांशी राम यांचे निधन. (जन्म: १५ मार्च १९३४)

२०१५: भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक रवींद्र जैन यांचे निधन. (जन्म: २८ फेब्रुवारी १९४४)