29 September

0
161

२९ सप्टेंबर – घटना

१८२९: लंडनच्या मेट्रोपॉलिटन पोलिसांची स्थापना झाली.

१९१६: जॉन डी. रॉकफेलर हे पहिले अब्जाधीश ठरले.

१९१७: मुंबईतील दादर येथे इंडियन एज्युकेशन सोसायटीची पहिली शाळा किंग जॉर्ज हायस्कूल सुरू झाली.

१९४१: दुसरे महायुद्ध – किएव्हमध्ये नाझींनी ३३,७७१ ज्यूंना ठार मारले.

१९६३: बिर्ला तारांगण हे आशियातील पहिले तारांगण कोलकाता येथे सुरू.

१९९१: हैतीमध्ये लष्करी उठाव.

२००८: लेहमन ब्रदर्स व वॉशिंग्टन म्युच्युअल या वित्तीय संस्थांच्या दिवाळखोरीमुळे न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजचा निर्देशांक एका दिवसात ७७८ ने कोसळला. अमेरिकन शेअर बाजारातील सर्वाधिक घट होती.

२०१२: अल्तमस कबीर भारताचे ३९ वे सरन्यायाधीश झाले.

२९ सप्टेंबर – जन्म

१७८६: मेक्सिको देशाचे पहिले राष्ट्रपती ग्वाडालुपे व्हिक्टोरिया यांचा जन्म. (मृत्यू: २१ मार्च १८४३)

१८९०: पंचांगकर्ते ल. गो. तथा नानाशास्त्री दाते यांचा जन्म.

१८९९: बॉलपोइंट पेनचे संशोधक लस्झो बियो यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑक्टोबर १९८५)

१९०१: नोबेल पारितोषिक विजेते इटालियन अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ एनरिको फर्मी यांचा जन्म. (मृत्यू: २८ नोव्हेंबर १९५४)

१९२५: समाजसेवक डॉ. शरदचंद्र गोखले यांचा जन्म. (मृत्यू: १५ जानेवारी २०१३)

१९२८: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रजेश मिश्रा यांचा जन्म. (मृत्यू: २८ सप्टेंबर २०१२)

१९३२: विनोदी अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते मेहमूद यांचा जन्म. (मृत्यू: २३ जुलै २००४)

१९३२: मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे अध्वर्यू हमीद दलवाई यांचा जन्म. (मृत्यू: ३ मे १९७७)

१९३३: मोजाम्बिक देशाचे पहिले राष्ट्रपती समोरा महेल यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑक्टोबर १९८६)

१९३६: इटली देशाचे पंतप्रधान सिल्व्हियो बेर्लुस्कोनी यांचा जन्म.

१९३८: नेदरलँड्स देशाचे पंतप्रधान विल्यम कॉक यांचा जन्म.

१९४३: नोबेल पारितोषिक विजेते पोलंड देशाचे राष्ट्राध्यक्ष लेक वॉलेसा यांचा जन्म.

१९४७: भारताचे ३८वे सरन्यायाधीश एस. एच. कपाडिया यांचा जन्म. (मृत्यू: ४ जानेवारी २०१६)

१९५१: चिली देशाच्या पहिल्या स्त्री राष्ट्राध्यक्ष मिशेल बाशेलेट यांचा जन्म.

१९५७: इंग्लिश क्रिकेटपटू व पंच ख्रिस ब्रॉड यांचा जन्म.

१९७८: अमेरिकन कसरतपटू मोहिनी भारद्वाज यांचा जन्म.

२९ सप्टेंबर – मृत्यू

८५५: रोमन सम्राट लोथार (पहिला) यांचे निधन.

१५६०: स्वीडनचा राजा गुस्ताव (पहिला) यांचे निधन.

१८३३: स्पेनचा राजा फर्डिनांड (सातवा) यांचे निधन. (जन्म: १४ ऑक्टोबर १७८४)

१९१३: डिझेल इंजिनचे संशोधक रुडॉल्फ डिझेल यांचे निधन. (जन्म: १८ मार्च १८५८)

१९८७: अमेरिकन उद्योगपती हेन्री फोर्ड दुसरा यांचे निधन.

१९९१: आग्रा घराण्याच्या ११व्या पिढीतील गायक उस्ताद युनूस हुसेन खाँ यांचे निधन. (जन्म: १५ नोव्हेंबर १९२७)