7 October

0
155

७ ऑक्टोबर – घटना

ख्रिस्त पूर्व ३७६१: हिब्रू दिनदर्शिकेनुसार जगाचा पहिला दिवस.

१९०५: पुण्यात विलायती कपड्यांची होळी करण्यात आली. परदेशी मालावर बहिष्कार घालण्यासाठी केलेला अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्‍न होता.

१९१२: हेलसिंकी स्टॉक एक्सचेंज सुरू झाले.

१९१९: महात्मा गांधींनी नवजीवन हे वृत्तपत्र सुरू केले.

१९१९: के. एल. एम. (KLM) या विमान कंपनीची स्थापना झाली.

१९३३: पाच छोट्या कंपन्यांचे एकत्रीकरण करुन एअर फ्रान्स ही कंपनी स्थापण्यात आली.

१९४९: जर्मन डेमॉक्रेटिक रिपब्लिक (पूर्व जर्मनी) ची स्थापना.

१९७१: ओमानचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

१९९६: फॉक्स न्यूज चॅनलचे प्रसारण सुरू होते.

२००१: सप्टेंबर ११ च्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला चढवला.

२००२: सलमान खान यांची वांद्रे पोलिसांत अटक.

७ ऑक्टोबर – जन्म

१८६६: मराठी काव्याचे प्रवर्तक कृष्णाजी केशव दामले तथा केशवसुत यांचा जन्म. (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९०५)

१८८५: अणूचे अंतरंग स्पष्ट करणार्‍या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे डॅनिश पदार्थवैज्ञानिक नील्स बोहर यांचा जन्म. (मृत्यू: १८ नोव्हेंबर १९६२)

१९००: जर्मन नाझी अधिकारी हाइनरिक हिमलर यांचा जन्म. (मृत्यू: २९ एप्रिल १९४५)

१९०७: गुजराथी नाटककार व लेखक, नेहरू पुरस्कार व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रागजी डोस्सा यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट १९९७)

१९१४: गझल, दादरा आणि ठुमरी गायिका बेगम अख्तर यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑक्टोबर १९७४)

१९१७: कवी आणि बालकुमार-साहित्यिक विनायक महादेव तथा वि. म. कुलकर्णी यांचा जन्म. (मृत्यू: १३ मे २०१० – पुणे)

१९२९: आयमॅक्स कॉर्पोरेशन चे सहसंस्थापक ग्रॅमी फर्ग्युसन यांचा जन्म.

१९५२: रशियाचे ४ थे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा जन्म.

१९५९: एक्स फैक्टर आणि ब्रिटन गॉट टेलेन्ट चे निर्माते शमौन कोवेल यांचा जन्म.

१९६०: शास्त्रीय गायिका आश्विनी भिडे-देशपांडे यांचा जन्म.

१९७८: भारतीय जलदगती गोलंदाज जहीर खान यांचा जन्म.

७ ऑक्टोबर – मृत्यू

१७०८: शिखांचे १० वे गुरू गुरू गोबिंद सिंग यांचे निधन. (जन्म: २२ डिसेंबर १६६६)

१८४९: अमेरिकन गूढ व भयकथांचा लेखक व कवी एडगर अ‍ॅलन पो यांचे निधन. (जन्म: १९ जानेवारी १८०९)

१९५१: फिलिप्स कंपनी चे सहसंस्थापक एंटोन फिलिप्स यांचे निधन. (जन्म: १४ मार्च १८७४)

१९७५: कन्नड कवी व विचारवंत देवनहळ्ळी वेंकटरामनय्या गुंडप्पा तथा डी. व्ही. जी. यांचे निधन. (जन्म: १८ जानेवारी १८८९ – मुळबागल, कोलार, कर्नाटक)

१९९८: महाराष्ट्राचे महसूलमंत्री, काँग्रेसचे नेते, पद्मश्री भाऊसाहेब वर्तक यांचे निधन.

१९९९: साहित्यिक, वाचकप्रिय वीणा या दर्जेदार मासिकाचे संपादक, बालसाहित्यकार उमाकांत निमराज ठोमरे यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १९२९ – अहमदनगर)

२०११: अल्बेनिया देशाचे पहिले अध्यक्ष रमीझ अलिया यांचे निधन. (जन्म: १८ ऑक्टोबर १९२५)