१४ ऑक्टोबर – घटना
१८८२: भारतात (सध्याच्या पश्चिम पाकिस्तान) पंजाब विद्यापीठ सुरु झाले.
१९१२: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष थियोडोर रुझवेल्ट यांच्यावर जॉन श्रॅन्क या वेडसर व्यक्तीने खुनी हल्ला केला.
१९२०: ऑक्सफर्ड विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रमास स्त्रियांना प्रवेश दिला.
१०२६: ए. ए. मिल्ने यांचे विनी-द-पूह हे लहान मुलांसाठी पुस्तक प्रकाशित झाले.
१९४७: चार्ल यॅगर या वैमानिकाने X-१ या विमानातून ध्वनीपेक्षा जास्त वेगाने पहिले यशस्वी उड्डाण केले.
१९५६: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सुमारे ३,८०,००० अनुयायांसह दीक्षाभूमी, नागपूर येथे बौद्ध धर्मात प्रवेश केला.
१९८१: उपराष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांची इजिप्तचे अध्यक्ष म्हणून निवड.
१९८२: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी अमली पदार्थांविरुद्ध युद्ध पुकारले.
१९९८: विख्यात अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना नोबेल पुरस्कार जाहीर.
१४ ऑक्टोबर – जन्म
१६४३: मुघल सम्राट बहादूरशहा जफर (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: २७ फेब्रुवारी १७१२)
१७८४: स्पेनचा राजा फर्डिनांड (सातवा) यांचा जन्म. (मृत्यू: २९ सप्टेंबर १८३३)
१८८२: आयर्लंड प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्राध्यक्ष इमॉन डी व्हॅलेरा यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑगस्ट १९७५)
१८९०: अमेरिकेचे ३४ वे राष्ट्राध्यक्ष ड्वाईट आयसेनहॉवर यांचा जन्म. (मृत्यू: २८ मार्च १९६९)
१९२४: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आसामी साहित्यिक वीरेन्द्रकुमार भट्टाचार्य यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑगस्ट १९९७)
१९२७: जेम्स बाँडच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध इंग्लिश अभिनेता रॉजर मूर यांचा जन्म.
१९३१: मैहर घराण्याचे सतारवादक निखिल बॅनर्जी यांचा जन्म. (मृत्यू: २७ जानेवारी १९८६)
१९३६: लेखक सुभाष भेंडे यांचा जन्म. (मृत्यू: २० डिसेंबर २०१०)
१९३९: राल्फ लॉरेन कॉर्पोरेशनचे संस्थापक राल्फ लॉरेन यांचा जन्म.
१९४०: भारतीय-गायक-गीतकार आणि अभिनेते क्लिफ रिचर्ड यांचा जन्म.
१९५८: इटावा घराण्याचे सतार वादक उस्ताद शाहिद परवेझ यांचा जन्म.
१९८१: भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर यांचा जन्म.
१४ ऑक्टोबर – मृत्यू
१९१९: जर्मन उद्योगपती जॉर्ज विलहेम फॉन सिमेन्स यांचे निधन. (जन्म: ३० जुलै १८५५)
१९४४: जर्मन सेनापती एर्विन रोमेल यांचे निधन. (जन्म: १५ नोव्हेंबर १८९१)
१९४७: साहित्यसम्राट नरसिंह चिंतामण तथा तात्यासाहेब केळकर यांचे निधन. (जन्म: २४ ऑगस्ट १८७२)
१९५३: संततिनियमन आणि लैंगिक शिक्षणसाठी विचारप्रवर्तन व प्रत्यक्ष कार्य करणारे विचारवंत र. धों. कर्वे यांचे निधन. (जन्म: १४ जानेवारी १८८२)
१९९३: वालचंद उद्योगसमूहाचे अध्यक्ष लालचंद हिराचंद दोशी यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर १९०४)
१९९४: इतिहासकार, विचारवंत, संशोधक सेतू माधवराव पगडी यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट १९१०)
१९९७: अमेरिकन कादंबरीकार हेरॉल्ड रॉबिन्स यांचे निधन. (जन्म: २१ मे १९१६)
१९९९: टांझानियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष ज्युलिअस न्येरेरे यांचे निधन. (जन्म: १३ एप्रिल १९२२)
२००४: स्वदेशी जागरण मंच, मजदूर संघ व कामगार संघ यांचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी यांचे निधन. (जन्म: १० नोव्हेंबर १९२०)
२०१३ केन्द्रीय मंत्री व सामाजिक कार्यकर्ते मोहन धारिया यांचे निधन. (जन्म: १४ फेब्रुवारी १९२५)
२०१५: भारतीय नौसेनाधिपती राधाकृष्ण हरिराम तहिलियानी यांचे निधन. (जन्म: १२ मे १९३०)