18 October

0
189

१८ ऑक्टोबर – घटना

१८६७: सोविएत रशियाला ७२ लाख डॉलर देऊन अमेरिकेने अलास्का हा प्रांत खरेदी करुन ताब्यात घेतला.

१८७९: थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना.

१९०६: महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशन ची स्थापना केली.

१९१९: राम गणेश गडकरी लिखित संगीत भावबंधन या नाटकाचा पहिला प्रयोग दीनानाथ मंगेशकरांच्या बळवंत संगीत नाटक मंडळी ने केला.

१९२२: ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशनची स्थापना.

१९५४: टेक्सास इन्स्ट्रूमेंट्सने पहिल्या ट्रान्झिस्टर रेडिओची घोषणा केली.

१९६७: सोविएत रशियाचे व्हेनेरा-४ हे अंतराळयान शुक्रावर उतरले.

१९७७: २०६०-चिरॉन हा अंतरिक्षातील सर्वात दूरवरील लघुग्रह शोधण्यात आला.

२००२: कसोटी व एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वीस हजार धावा करणारा सचिन तेंडुलकर पहिला क्रिकेटपटू ठरला.

१८ ऑक्टोबर – जन्म

१८०४: थायलंडचा राजा मोंगकुट ऊर्फ राम (चौथा) यांचा जन्म. (मृत्यू: १ ऑक्टोबर १८६८)

१८६१: न्यायाधीश, कायदेपंडित, लेखक भारताचार्य’ चिंतामणराव वैद्य यांचा जन्म. (मृत्यू: २० एप्रिल १९३८)

१९२५: नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) चे संचालक इब्राहिम अल्काझी यांचा जन्म.

१९२५: अल्बेनिया देशाचे पहिले अध्यक्ष रमीझ अलिया यांचा जन्म. (मृत्यू: ७ ऑक्टोबर २०११)

१९३९: राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडीचा मारेकरी ली हार्वे ओस्वाल्ड यांचा जन्म. (मृत्यू: २४ नोव्हेंबर १९६३)

१९५०: अभिनेता ओम पुरी यांचा जन्म.

१९५६: झेकोस्लोव्हाकियाची लॉन टेनिस खेळाडू मार्टिना नवरातिलोव्हा यांचा जन्म.

१९६५: इस्लामिक रिसर्च फाउंडेशन (आयआरएफ) चे संस्थापक आणि अध्यक्ष झाकीर नाईक यांचा जन्म.

१९७४: भारतीय लेखक अमिश त्रिपाठी यांचा जन्म.

१९७७: भारतीय अभिनेता कुणाल कपूर यांचा जन्म.

१९८४: भारतीय अभिनेत्री फ्रीडा पिंटो यांचा जन्म.

१८ ऑक्टोबर – मृत्यू

१८७१: पहिल्या यांत्रिकी संगणकाचे जनक चार्ल्स बॅबेज यांचे निधन. (जन्म: २६ डिसेंबर १७९१)

१९०९: देशभक्त, काँग्रेसचे १६ वे अध्यक्ष लालमोहन घोष यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १८४९ – कलकत्ता)

१९३१: अमेरिकन संशोधक आणि उद्योजक थॉमस अल्वा एडिसन यांचे निधन. (जन्म: ११ फेब्रुवारी १८४७)

१९५१: पहिल्या स्त्री नाटककार, गायिका, संगीतकार हिराबाई पेडणेकर यांचे निधन. (जन्म: २२ नोव्हेंबर १८८५)

१९७६: भारतीय कवी आणि लेखक विश्वनाथ सत्यनारायण यांचे निधन. (जन्म: १० सप्टेंबर १८९५)

१९८३: क्रिकेटपटू विजय मांजरेकर यांचे निधन. (जन्म: २६ सप्टेंबर १९३१)

१९८७: कम्युनिस्ट कार्यकर्ते वसंतराव तुळपुळे यांचे निधन.

१९९३: भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या बालअभिनेत्री मंदाकिनी विश्वनाथ आठवले यांचे निधन.

१९९५: छायालेखक ई. महमद यांचे निधन.

२००४: चंदन तस्कर वीरप्पन यांचे निधन. (जन्म: १८ जानेवारी १९५२)