२४ ऑक्टोबर – घटना
१६०५: मुघल सम्राट जहांगिर यांचा राज्याभिषेक झाला.
१८५१: विल्यम लसेल यांनी उरेनस ग्रहाच्या अंब्रियाल व अरीयेल चंद्राचा शोध लावला.
१८५७: शेफील्ड एफ.सी. हा जगातील सर्वात जुना फुटबॉल क्लब शेफील्ड, इंग्लँड येथे सुरु झाला.
१९०१: एनी एडसन टेलर हे नायगारा धबधब्यात बॅरल मधून उडी मारणारे पहिले व्यक्ती ठरले.
१९०९: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बॅ. गांधी यांच्या अध्यक्षतेखाली लंडनमध्ये प्रथमच दसर्याचा उत्सव साजरा केला.
१९४५: संयुक्त राष्ट्रांची (United Nations) स्थापना झाली.
१९४९: युनायटेड नेशन्सच्या मुख्यालयाचे काम सुरु झाले.
१९६३: देशात असलेल्या दुष्काळामुळे सार्वजनिक व मोठया समारंभात तांदळाच्या पदार्थावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली.
१९६४: उत्तर र्होडेशियाला युनायटेड किंगडमपासुन स्वातंत्र्य मिळाले व त्याचे झांबिया असे नामकरण करण्यात आले.
१९७२: दुष्काळग्रस्त गुरे वाचवण्यासाठी सकाळ रिलीफ फंड या संस्थेतर्फे दत्तक बैल योजना सुरू करण्यात आली.
१९८४: भारतामधे प्रथमच भुयारी रेल्वे कोलकाता येथे सुरू झाली.
१९९७: सतारवादक पंडित रविशंकर यांना संगीतक्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जपानचा प्रिमियम इंपिरिअल आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान.
२०००: थोर समाजसेवक बाबा आमटे यांना केन्द्र सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला.
२००२: सलमान खान यांचा पुन्हा जमीन मंजूर आणि सुटका.
२००३: कॉनकॉर्ड विमानची शेवटची व्यावसायिक उड्डाण झाली.
२०१६: सायरस मिस्त्री यांची टाटा समूहाच्या चेअरमन पदावरून हकालपट्टी.
२४ ऑक्टोबर – जन्म
१६३२: डच सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ अँथनी व्हॉन लीवेनहॉक यांचा जन्म. (मृत्यू: २६ ऑगस्ट १७२३)
१७७५: दिल्लीचा शेवटचा बादशहा बहादूरशहा जफर यांचा जन्म. (मृत्यू: ७ नोव्हेंबर १८६२)
१८६८: औंध संस्थानचे अधिपती, चित्रकार, कीर्तनकार भवानराव श्रीनिवासराव तथा बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांचा जन्म. (मृत्यू: १३ एप्रिल १९५१)
१८९४: भारतीय लेखक, कवी आणि नाटककार विभुद्धभाषण मुखोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै १९८७)
१९१०: मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री लीला ऊर्फ माई भालजी पेंढारकर यांचा जन्म.
१९१४: आझाद हिंद सेनेतील झाशी राणी रेजिमेंटच्या कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचा जन्म. (मृत्यू: २३ जुलै २०१२)
१९२१: व्यंगचित्रकार रासीपुरम कृष्णस्वामी तथा आर. के. लक्ष्मण यांचा जन्म. (मृत्यू: २६ जानेवारी २०१५)
१९२६: सिक्कीमचे राज्यपाल, दिल्लीचे महापौर केदारनाथ सहानी यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑक्टोबर २०१२)
१९३५: भारतीय पत्रकार आणि लेखक म्हणून मार्क टुली यांचा जन्म.
१९६३: भारतीय अमेरिकन उद्योगपती अरविंद रघुनाथन यांचा जन्म.
१९७२: अभिनेत्री व मॉडेल रीमा लांबा ऊर्फ मल्लिका शेरावत यांचा जन्म.
२४ ऑक्टोबर – मृत्यू
१६०१: डच खगोलशास्त्रज्ञ टायको ब्राहे यांचे निधन. (जन्म: १४ डिसेंबर १५४६)
१९२२: कॅडबरी चे संस्थापक जॉर्ज कॅडबरी यांचे निधन. (जन्म: १९ सप्टेंबर १८३९)
१९४४: रेनॉल्ट कंपनी चे संस्थापक लुई रेनॉल्ट यांचे निधन. (जन्म: १२ फेब्रुवारी १८७७)
१९७९: अबारथ कंपनी चे संस्थापक कार्लो अबारट यांचे निधन. (जन्म: १५ नोव्हेंबर १९०८)
१९९१: स्टार ट्रेक चे निर्माते जीन रोडडेबेरी यांचे निधन. (जन्म: १९ ऑगस्ट १९२१)
१९९१: ऊर्दू कथा व पटकथा लेखिका इस्मत चुगताई यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १९१५)
१९९२: मराठी नवकथेचे जनक अरविंद गोखले यांचे निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १९१९)
१९९५: पत्रकार, भारतीय श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष माधवराव साने यांचे निधन.
२०११: लिस्प प्रोग्रॅमिंग लँग्वेज चे जनक जॉन मॅककार्थी यांचे निधन. (जन्म: ४ सप्टेंबर १९२७)
२०१३: पार्श्वगायक प्रबोधचंद्र तथा मन्ना डे यांचे निधन. (जन्म: १ मे १९१९)
२०१४: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते एस. एस. राजेंद्रन यांचे निधन.