२६ ऑक्टोबर – घटना
१८६३: जगातील सर्वात जुने फुटबॉल असोसिएशन लंडनमध्ये सुरु झाले.
१९०५: नॉर्वे स्वीडनपासुन स्वतंत्र झाला.
१९३६: हूवर धरणांवरील पहिले इलेक्ट्रिक जनरेटर पूर्णपणे सुरु झाले.
१९४७: जम्मू आणि काश्मीरचे राज्य भारतात विलीन झाले.
१९५८: पॅन अमेरिकन एअरवेज ची पहिले व्यावसायिक विमानसेवा सुरु झाली.
१९६२: रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील भारतीय विद्याभवन येथे झाला.
१९९४: जॉर्डन आणि इस्त्राएल यांनी शांतता करारावर सह्या केल्या.
१९९९: राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (NCL) संशोधक व्ही. व्ही. रानडे यांना केंद्र सरकारतर्फे स्वर्णजयंती फेलोशिप जाहीर.
२६ ऑक्टोबर – जन्म
१२७०: संत नामदेव यांचा जन्म. (मृत्यू: ३ जुलै १३५०)
१८९०: भारतीय पत्रकार आणि राजकारणी गणेश शंकर विद्यार्थी यांचा जन्म. (मृत्यू: २५ मार्च १९३१)
१८९१: सहकारी चळवळीचे प्रवर्तक वैकुंठ मेहता यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑक्टोबर १९६४)
१९००: माहितीपट निर्मितीचे आद्य प्रवर्तक इर्झा मीर यांचा जन्म. (मृत्यू: ७ मार्च १९९३)
१९१६: फ्रान्सचे २१ वे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवाँ मित्राँ यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी १९९६)
१९१९: शाह ऑफ इराण मोहम्मद रझा पेहलवी यांचा जन्म. (मृत्यू: २७ जुलै १९८०)
१९३७: संगीतकार व गायक हृदयनाथ मंगेशकर यांचा जन्म.
१९४७: अमेरिकेच्या ६७ व्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांचा जन्म.
१९५४: नाट्य आणि चित्रपट अभिनेते लाक्शीकांत बेर्डे यांचा जन्म. (मृत्यू: १६ डिसेंबर २००४)
१९७४: अभिनेत्री रवीना टंडन यांचा जन्म.
२६ ऑक्टोबर – मृत्यू
१९०९: जपानचे पहिले पंतप्रधान इटो हिरोबुमी यांचे निधन. (जन्म: १६ ऑक्टोबर १८४१)
१९३०: प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लशीचा शोध लावणारे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. वाल्डेमर हाफकिन यांचे निधन. (जन्म: १५ मार्च १८६०)
१९७९: अर्थशास्त्रज्ञ चंदूलाल नगीनदास वकील यांचे निधन.
१९९१: स्वातंत्र्यसैनिक, लेखक, दैनिक मराठवाडा चे संपादक अनंत काशिनाथ भालेराव यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १९१९)
१९९९: भारतीय-अमेरिकन लेखक आणि शिक्षक एकनाथ इशारानन यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १९१०)