१० नोव्हेंबर – घटना
१६५९: शिवाजी महाराजांनी प्रतापगड येथे अफझलखानाचा वध केला.
१६९८: ईस्ट इंडिया कंपनीने कलकत्ता बंदर स्थानिक राजाकडून विकत घेतले.
१९९०: भारताचे ८ वे पंतप्रधान म्हणून चंद्रशेखर यांनी सूत्रे हाती घेतली.
१९५८: गुजरातमध्ये बडोद्याजवळ वेदसार येथे प्रायोगिक विहिरीमध्ये तेल सापडले.
१९६०: नागविदर्भ चळवळीच्या आदेशावरून नागपुरात हरताळ, घाऊक व्यापार, दुकाने, हॉटेले बंद.
१९८३: बिल गेट्स यांनी विंडोज १.० प्रकाशित केले.
१९९९: शास्त्रीय संगीतातील बहुमोल कामगिरीबद्दल मध्य प्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा तानसेन सन्मान गायक पं. सी. आर. व्यास यांना जाहीर.
२००१: ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ आणि आणूऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. आर चिदंबरम यांची केन्द्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार म्हणून निवड.
२००६: तामिळ वंशाचे श्रीलंकेतील संसद सदस्य नादराजा रविराज यांची कोलंबो येथे हत्या.
१० नोव्हेंबर – जन्म
१८१०: फ्लश शौचालय चे निर्माते जॉर्ज जेनिंग्स यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल १८८२)
१८४८: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक राष्ट्रगुरू सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑगस्ट १९२५)
१८५१: प्राण्यांच्या वर्गीकरणाविषयी मूलभूत संशोधन करणारे ब्रिटीश निसर्ग शास्त्रज्ञ फ्रान्सिस बाल्फोर यांचा जन्म. (मृत्यू: १९ जुलै १८८२)
१९०४: श्रेष्ठ मराठी कथालेखिका व समीक्षक कुसुमावती देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू: १७ नोव्हेंबर १९६१)
१९१९: एके ४७ बंदुकीचे निर्माते मिखाईल कलाशनिको यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर २०१३)
१९२५: अभिनेता रिचर्ड बर्टन यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑगस्ट १९८४)
१९४४: किर्गिस्तान देशाचे पहिले अध्यक्ष असगर अकयेव यांचा जन्म.
१९५२: सुप्रसिद्ध लेखिका सानिया उर्फ सुनंदा बलरामन् यांचा जन्म.
१९६४: हिंदी चित्रपट अभिनेते आशुतोष राणा यांचा जन्म.
१० नोव्हेंबर – मृत्यू
१६५९: विजापूरचे सरदार अफजलखान यांचा शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर वध केला.
१९२०: स्वदेशी जागरण मंच, भारतीय मजदूर संघ व भारतीय कामगार संघ यांचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी यांचे निधन. (जन्म: १४ ऑक्टोबर २००४)
१९२२: शिवकालीन जंत्रीचे कर्ते, गणितज्ञ व ज्योतिर्विद गणेश सखाराम खरे यांचे पुणे येथे निधन.
१९३८: तुर्कस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष मुस्तफा कमाल अतातुर्क यांचे निधन. (जन्म: १९ मे १८८१)
१९४१: संत चरित्रकार आणि प्राचीन वाङ्मयाचे इतिहासकार ल. रा. पांगारकर यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १८७२)
१९८२: रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस लिओनिद ब्रेझनेव्ह यांचे निधन. (जन्म: १९ डिसेंबर १९०६)
१९९६: सुप्रसिद्ध गायिका माणिक वर्मा यांचे निधन. (१६ मे १९२६)
२००३: झिम्बाब्वे देशाचे पहिले अध्यक्ष कन्नान बनान यांचे निधन. (जन्म: ५ मार्च १९३६)
२००९: अभिनेत्री सिंपल कपाडिया यांचे निधन.(जन्म: १५ ऑगस्ट १९५८)
२०१३: भारतीय लेखक विजयदन देठा यांचे निधन. (जन्म: १ सप्टेंबर १९२६)