११ नोव्हेंबर – घटना
१९२६: अमेरिकेतील रस्त्यांना सख्यांवरून नामकरण करण्यात आले.
१९३०: आइनस्टाइन रेफ्रिजरेटरच्या शोधासाठी अल्बर्ट आइनस्टाइन आणि लिओ झिझार्ड यांना पेटंट देण्यात आले.
१९४२: दुसरे महायुद्ध – नाझी जर्मनीने फ्रान्सचा कब्जा घेतला.
१९४७: पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यात आले.
१९६२: कुवेत देशाने नवीन संविधान अंगीकारले.
१९७५: अंगोला देशाला स्वातंत्र्य मिळाले.
१९८१: अँटिगा आणि बार्बुडा या देशांचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
२००४: यासर अराफत यांच्या मृत्यूपश्चात महमूद अब्बास यांची पॅलेस्टाईन मुक्ती संघटने (PLO) च्या अध्यक्षपदी नियुक्ती.
११ नोव्हेंबर – जन्म
१८२१: रशियन कादंबरीकार आणि तत्त्वज्ञ फ्योदोर दोस्तोवस्की यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी १८७१)
१८५१: विद्वान व समाजसुधारक राजारामशास्त्री भागवत यांचा जन्म. (मृत्यू:४ जानेवारी १९०८ – मुंबई)
१८७२: किराणा घराण्याचे संस्थापक व सवाई गंधर्वांचे गुरु संगीतरत्न उस्ताद अब्दुल करीम खाँ यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑक्टोबर १९३७)
१८८६: लावणी लेखक श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा पठ्ठे बापूराव यांचा जन्म. (मृत्यू: २२ डिसेंबर १९४५)
१८८८: स्वातंत्र्यसेनानी, गांधीवादी, समाजवादी आणि पर्यावरणवादी जीवटराम भगवानदास तथा आचार्य कॄपलानी यांचा जन्म. (मृत्यू: १९ मार्च १९८२)
१८८८: स्वातंत्र्यचळवळीतील विद्वान नेते, भारताचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्न मौलाना अबूल कलाम आझाद यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी १९५८)
१९०४: भारतीय-अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक जे. एच. सी. व्हाइटहेड यांचा जन्म. (मृत्यू: ८ मे १९६०)
१९११: लोककवी गोपाळ नरहर तथा मनमोहन नातू यांचा जन्म. (मृत्यू: ७ मे १९९१)
१९२४: कसोटीपटू रुसी शेरियर मोदी यांचा जन्म. (मृत्यू: १७ मे १९९६)
१९२६: विनोदी अभिनेता बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ जॉनी वॉकर यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै २००३)
१९३६: मतिमंद मुलांसाठी कार्य करणाऱ्या पुण्याच्या कामायनी या संस्थेच्या संस्थापिका सिंधुताई जोशी यांचा जन्म.
१९३६: हिंदी, नेपाळी व बंगाली चित्रपट अभिनेत्री माला सिन्हा यांचा जन्म.
१९४२: वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू रॉय फ्रेड्रिक्स यांचा जन्म. (मृत्यू: ५ सप्टेंबर २०००)
१९६२: अमेरिकन अभिनेत्री, निर्मात्या, दिग्दर्शिका, गीतलेखिका आणि मॉडेल डेमी मूर यांचा जन्म.
१९८५: भारतीय क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा यांचा जन्म.
११ नोव्हेंबर – मृत्यू
१९८४: मानवाधिकारांसाठी आजीवन संघर्ष करणारे नेते मार्टिन ल्यूथर किंगसिनीअर यांचे निधन. (जन्म: १९ डिसेंबर १८९९)
१९९४: ज्ञानपीठ विजेते कन्नड लेखक व कवी कुपल्ली वेंकटप्पागौडा पुट्टप्पा उर्फ कुवेम्पू यांचे निधन. (जन्म: २९ डिसेंबर १९०४)
१९९७: चित्रपट अभिनेते यशवंत दत्तात्रय महाडिक ऊर्फ यशवंत दत्त यांचे निधन.
१९९९: शिल्पकार अरविंद मेस्त्री यांचे निधन.
२००४: नोबेल पारितोषिक विजेते पॅलेस्टाईनचे नेते यासर अराफत यांचे निधन. (जन्म: २४ ऑगस्ट १९२९)
२००५: ऑस्ट्रियन अमेरिकन व्यवस्थापन तज्ञ, लेखक पीटर ड्रकर यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १९०९)
२००५: नेत्रतज्ज्ञ डॉ. एम. सी. मोदी. यांचे निधन.