१७ नोव्हेंबर – घटना
१८३१: ग्रॅन कोलंबिया या प्रांताचे विभाजन होऊन इक्वेडोर व व्हेनेझुएला असे दोन देश अस्तित्त्वात आले.
१८६९: भूमध्य समुद्र व लाल समुद्र यांना जोडणार्या सुएझ कालव्याचे उद्घाटन झाले. या कालव्याचे बांधकाम मात्र १० वर्षे आधीच पूर्ण झाले होते.
१९३२: तिसर्या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.
१९३३: अमेरिकेने सोविएत युनियनला मान्यता दिली.
१९५०: ल्हामो डोंड्रब हे अधिकृतपणे १४वे दलाई लामा बनले.
१९९२: देवरुख येथील मातृमंदिर संस्थेच्या संस्थापिका इंदिराबई हळबे यांची जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड.
१९९२: महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष हरी नरके यांना दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीची फेलोशिप जाहीर.
१९९४: रशियाच्या मीर या अंतराळस्थानकाने पृथ्वीभोवती ५०,००० फेर्या पूर्ण करून नवा विक्रम केला.
१९९६: पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (NCL) सेन्द्रिय रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. के. एन. गणेश यांची अहमदाबादच्या नॅशनल अॅकेडमी ऑफ सायन्सेस चे फेलो म्हणून निवड.
१७ नोव्हेंबर – जन्म
०००९: रोमन सम्राट व्हेस्पासियन यांचा जन्म. (मृत्यू: २३ जून ००७९)
१७४९: कॅनिंग चे निर्माते निकोलस एपर्टीट यांचा जन्म. (मृत्यू: १ जून १८४१)
१७५५: फ्रान्सचा राजा जन्म लुई (अठरावा) यांचा जन्म. (मृत्यू: १६ सप्टेंबर १८२४)
१९०१: युरोपियन कमिशनचे पहिले अध्यक्ष वॉल्टर हॉलस्टेन यांचा जन्म. (मृत्यू: २९ मार्च १९८२)
१९०६: होंडा मोटर कंपनी चे सहसंस्थापक सोईचिरो होंडा यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑगस्ट १९९१)
१९२०: भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक मिथुन गणेशन यांचा जन्म. (मृत्यू: २२ मार्च २००२)
१९२३: केप व्हर्दे देशाचे पहिले अध्यक्ष अरिसिदास परेरा यांचा जन्म. (मृत्यू: २२ सप्टेंबर २०११)
१९२५: अमेरिकन अभिनेता रॉक हडसन यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑक्टोबर १९८५)
१९३२: अभिनेत्री शकुंतला महाजन तथा बेबी शकुंतला यांचा जन्म. (मृत्यू: १८ जानेवारी २०१५ – कोल्हापूर)
१९३८: लेखक, नाटककार, निर्माते रत्नाकर मतकरी यांचा जन्म.
१९८२: भारतीय क्रिकेटपटू युसूफ पठाण यांचा जन्म.
१७ नोव्हेंबर – मृत्यु
१८१२: द टाईम्स वृत्तपत्र चे संस्थापक जॉन वॉल्टर यांचे निधन.
१९२८: स्वातंत्र्यसेनानी पंजाब केसरी लाला लजपतराय यांचे निधन. (जन्म: २८ जानेवारी १८६५)
१९३१: संस्कृत विद्वान, शिक्षणतज्ञ, इतिहासकार हरप्रसाद शास्त्री यांचे निधन. (जन्म: ६ डिसेंबर १८५३)
१९३५: भारत सेवक समाजाचे (Servants of India Society) एक संस्थापक सदस्य गोपाळ कृष्ण देवधर यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट १८७१)
१९६१: साहित्यिक व समीक्षक कुसुमावती आत्माराम देशपांडे यांचे निधन. (जन्म: १० नोव्हेंबर १९०४)
२००३: भारतीय गायक सुरजित बिंद्राखिया यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १९६२)
२०१२: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे निधन. (जन्म: २३ जानेवारी १९२६)
२०१२: भारतीय उद्योगपती पॉंटि चड्डा यांचे निधन. (जन्म: २२ ऑक्टोबर १९५७)
२०१५: विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल यांचे निधन.
२०१५: कर्नल संतोष महाडिक कुपवाडा श्रीनगर येथे कोम्बिंग ऑपरेशनचे नेतृत्व करताना शहीद.