२१ नोव्हेंबर – घटना
१८७७: थॉमस एडिसन यांनी फोनोग्राफ शोधाची घोषणा केली.
१९११: संसदेच्या निवडणुकीत उभे राहता यावे आणि मतदानाचा अधिकार मिळावा म्हुणुन लंडनमध्ये स्त्रियांनी केलेल्या मोर्च्यावर व्हाईट हॉल येथे घोडेस्वार पोलिसांनी लाठी हल्ला केला.
१९४२: राजा नेने दिग्दर्शित दहा वाजता हा प्रभातचा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.
१९५५: संयुक्त महाराष्ट्रसाठी लढा पुकारला.
१९६२: भारताचे संरक्षण मंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांची नियुक्ती झाली.
१९६२: भारत चीन युद्ध – भारतीय प्रदेशावर आक्रमण करणार्या चीनने १९ नोव्हेंबर रोजी जाहीर केलेली एकतर्फी युद्धबंदी अमलात आली.
१९७१: भारीतय वायुदलाची पाकिस्तानी सैन्याशी बांगलादेश मुक्ती युद्धातील गरीबपुरच्या लढाईत पहिली चकमक. पाकिस्तानचा सपशेल पराभव.
१९७२: दक्षिण कोरियाने नवीन संविधान अंगीकारले.
२१ नोव्हेंबर – जन्म
१६९४: फ्रेंच तत्त्वज्ञानी व्हॉल्तेर यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे १७७८)
१८९९: ओडिशाचे पहिले मुख्यमंत्री हरेकृष्णा महाबत यांचा जन्म. (मृत्यू: २ जानेवारी १९८७)
१९१०: चीनी भाषेतील लेखक छ्यान चोंग्शू यांचा जन्म.
१९२६: हिंदी चित्रपटात नायक व खलनायकाच्या भूमिका गाजवणारे अभिनेते प्रेम नाथ यांचा जन्म. (मृत्यू: ३ नोव्हेंबर १९९२)
१९२७: नाटककार शं. ना. नवरे यांचा जन्म. (मृत्यू: २५ सप्टेंबर २०१३)
१९८७: भारतीय बुद्धीबळपटू ईशा करवडे यांचा जन्म.
२१ नोव्हेंबर – मृत्यू
१९०८: देशभक्त सत्येंद्रनाथ बोस यांना अलीपूर कारागृहात फाशी.
१९६३: प्रसिद्ध विनोदी लेखक चिंतामण विनायक जोशी यांचे निधन. (जन्म: १९ जानेवारी १८९२)
१९७०: नोबेल पारितोषिक विजेते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर चंद्रशेखर व्यंकटरमण (सी. व्ही. रमण) यांचे निधन. (जन्म: ७ नोव्हेंबर १८८८)
१९९६: भौतिकशास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते एकमेव पाकिस्तानी डॉ. मोहम्मद अब्दूस सलाम यांचे निधन. (जन्म: २९ जानेवारी १९२६ – संतोकदास, साहिवाल, पंजाब, पाकिस्तान)
१९९७: आचार्य बाळाराव सावरकर यांचे निधन.
२०१५: भारतीय-पाकिस्तानी कवी आणि राजकारणी अमीन फहीम यांचे निधन. (जन्म: ४ ऑगस्ट १९३९)