२५ नोव्हेंबर – घटना
१६६४: छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचा पाया घातला.
१९२२: मधुमेह या आजारावरील इन्सुलिन चा शोध फ्रेडरिक बँटिंगनी यांनी जाहीर केला.
१९४८: नेशनल कॅडेट कोर्सची स्थापना.
१९७५: सुरीनामला नेदरलँड्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
१९८१: अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला गेला.
१९९१: कमल नारायण सिंग यांनी भारताचे २२ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९९४: राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. रघुनाथ माशेलकर यांना कलकत्ता येथील इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनतर्फे देण्यात येणारा राज क्रिस्टो दत्त स्मृती पुरस्कार जाहीर.
१९९९: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार जाहीर.
२०००: सतारवादक उस्ताद अब्दुल हलीम जाफर खाँ यांना मध्यप्रदेश सरकारचा तानसेन सन्मान जाहीर.
२५ नोव्हेंबर – जन्म
१८४१: जर्मन गणितज्ञ आर्न्स्ट श्रोडर यांचा जन्म.
१८४४: मर्सिडीज-बेंझ चे संस्थापक कार्ल बेंझ यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १९२९)
१८७२: ख्यातनाम नाटककार व पत्रकार, केसरी चे संपादक, नवाकाळ चे संस्थापक कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ ऑगस्ट १९४८)
१८७९: आध्यात्मिक गुरु व शिक्षणतज्ञ साधू वासवानी यांचा जन्म. (मृत्यू: १६ जानेवारी १९६६)
१८८२: मराठी चित्रकार सावळाराम लक्ष्मण हळदणकर यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे १९६८)
१८९८: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक देबाकी बोस यांचा जन्म.
१९२१: नटवर्य भालचंद्र पेंढारकर यांचा जन्म.
१९२६: भारताचे २१ वे सरन्यायाधीश रंगनाथ मिश्रा यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर २०१२)
१९३५: महाराष्ट्रीय हॉकीपटू गोविंद सावंत यांचा जन्म.
१९३७: शिक्षणतज्ज्ञ साधू वासवानी यांचा जन्म.
१९३९: मेवाती घराण्याचे गायकी अंगाने वाजवणारे सतारवादकउस्ताद रईस खान यांचा जन्म.
१९५२: पाकिस्तानचा क्रिकेटपटू इम्रान खान यांचा जन्म.
१९७२: भारतीय क्रिकेटपटू दीपा मराठे यांचा जन्म.
१९८३: भारतीय क्रिकेटर झुलन गोस्वामी यांचा जन्म.
२५ नोव्हेंबर – मृत्यु
१८८५: स्पेनचा राजा अल्फान्सो (बारावा) यांचे निधन. (जन्म: २८ नोव्हेंबर १८५७)
१९२२: प्राच्यविद्यासंशोधक, भाषाशास्त्रज्ञ व साहित्यसमीक्षक पांडुरंग दामोदर गुणे यांचे निधन. (जन्म: २० मे १८८४ – राहुरी, अहमदनगर, महाराष्ट्र)
१९६०: प्राच्यविद्यापंडित अनंत सदाशिव अळतेकर यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १८९८)
१९६२: आधुनिक संतकवी गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ दासगणू महाराज यांचे निधन. (जन्म: ६ जानेवारी १८६८ – अकोळनेर, अहमदनगर)
१९७४: संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस उ. थांट यांचे निधन. (जन्म: २२ जानेवारी १९०९)
१९८४: भारताचे माजी उपपंतप्रधान आणि महाराष्ट राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे निधन. (जन्म: १२ मार्च १९१३)
१९९७: लोकमत चे संस्थापक, संपादक, माजी मंत्री व स्वातंत्र्य सेनानी जवाहरलालजी दर्डा यांचे निधन.
१९९७: मलावी देशाचे पहिले अध्यक्ष हेस्टिंग्ज बांदा यांचे निधन. (जन्म: १४ मे १८९८)
१९९८: प्रशासक व मुत्सद्दी, पंतप्रधानांचे मुख्य सचिव, योजना आयोगाचे उपाध्यक्ष परमेश्वर नारायण तथा पी. एन. हक्सर यांचे निधन. (जन्म: ४ सप्टेंबर १९१३ – गुजरानवाला, पंजाब, पाकिस्तान)
२०१३: बालसाहित्यिका लीला पोतदार तथा लीलावती भागवत यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर १९२०)
२०१४: भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना, आणि कोरिओग्राफर सितारा देवी यांचे निधन. (जन्म: ८ नोव्हेंबर १९२०)
२०१६: क्युबाचे क्रांतिकारक आणि पंतप्रधान फिडेल अलेहांद्रो कॅस्ट्रो रूझ यांचे निधन. (जन्म: १३ ऑगस्ट १९२६)