१५ डिसेंबर – घटना
१८०३: नागपूरकर भोसलेंनी ओरिसाचा ताबा इस्ट इंडिया कंपनीकडे दिला.
१९४१: जपानी सैन्याचा हाँगकाँगमध्ये प्रवेश झाला.
१९६०: नेपाळचे राजा महेन्द्र यांनी देशाचे संविधान, संसद आणि कॅबिनेट निलंबित करून थेट शासन लादले.
१९७०: व्हेनेरा-७ हे रशियाचे अंतराळयान यशस्वीपणे शुक्र ग्रहावर उतरले.
१९७१: बांगलादेश स्वतंत्र झाला.
१९७६: सामोआचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.
१९९१: चित्रपट दिगदर्शक सत्यजित रे यांना ऑस्कर पारितोषिक जाहीर झाले.
१९९८: बॅंकॉक येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला कबड्डीमध्ये सलग तिसरे सुवर्णपदक मिळाले.
२००३: फ्रांसचा फुटबॉलपटू झिनादिन झिदान यांची वर्षातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून निवड झाली.
१५ डिसेंबर -जन्म
३७: रोमन सम्राट नीरो यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून ६८)
६८७: पोप सर्गिअस (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: ८ सप्टेंबर ७०१)
१८३२: फ्रेंच वास्तुरचनाकार, आयफेल टॉवरचे निर्माता आणि अभियंता गुस्ताव अलेक्झांद्रे आयफेल यांचा जन्म. (मृत्यू: २७ डिसेंबर १९२३)
१८५२: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच पदार्थ वैज्ञानिक हेन्री बेक्वेरेल यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑगस्ट १९०८)
१८६१: दुर्यिया मोटर वॅगन कंपनीचे संस्थापक चार्ल्स दुर्यिया यांचा जन्म. (मृत्यू: २८ सप्टेंबर १९३८)
१८९२: गेटी ऑईल कंपनीचे संस्थापक जे. पॉल गेटी यांचा जन्म. (मृत्यू: ६ जून १९७६)
१९०३: स्वामी स्वरुपानंद यांचा जन्म. (मृत्यू: १५ ऑगस्ट १९७४)
१९०५: साहित्य अकादमी पुरकर विजेत्या मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ आणि शिक्षणशास्त्रज्ञ इरावती कर्वे यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑगस्ट १९७०)
१९२६: प्रहसन लेखक व अभिनेते बबन प्रभू यांचा जन्म.
१९३२: प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष सरकारी अधिकारी टी. एन. शेषन यांचा जन्म.
१९३३: लोकसाहित्याचे अभ्यासक लेखक डॉ. प्रभाकर मांडे यांचा जन्म.
१९३३: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक बापू यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑगस्ट २०१४)
१९३५: पार्श्वगायिका व संगीतकार उषा मंगेशकर यांचा जन्म.
१९३७: संतसाहित्य, भाषाविज्ञान अभ्यासक प्र. कल्याण काळे यांचा जन्म.
१९७६: भारतीय फुटबॉलपटू बैचुंग भुतिया यांचा जन्म.
१५ डिसेंबर – मृत्यू
१८७८: बेकिंग पावडरचे शोधक आल्फ्रेड बर्ड यांचे निधन.
१९५०: स्वातंत्र्य सेनानी, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधानमंत्री आणि पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचे निधन. (जन्म: ३१ ऑक्टोबर १८७५)
१९६६: मिकी माऊस चे जनक वॉल्ट इलायान डिस्ने यांचे निधन. (जन्म: ५ डिसेंबर १९०१)
१९८५: मॉरिशसचे पहिले प्रधानमंत्री शिवसागर रामगुलाम यांचे निधन. (जन्म: १८ सप्टेंबर १९००)