16 December

0
186

१६ डिसेंबर – घटना

१४९७: वास्को-द-गामाने केप ऑफ गुड होपला वळसा घातला.

१७७३: अमेरिकन राज्यक्रांती – बॉस्टन टी पार्टी.

१८५४: भारतातील पहिल्या इंजिनीअरिंग कॉलेजची स्थापना पुणे येथे झाली.

१९०३: मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेल ग्राहकांसाठी खुले करण्यात आले.

१९२८: मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक बोगद्यातून सुरु झाली.

१९३२: प्रभातचा मायामच्छिंद्र हा चित्रपट प्रदर्शित झाला.

१९४६: थायलँडचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

१९७१: पाकिस्तानने भारताविरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करली.

१९८५: कल्पक्कम येथील इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रातील प्रायोगिक फस्ट ब्रीडर रिअॅक्टर राष्ट्राला समर्पित.

१९९१: पुर्वीच्या सोविएत संघराज्यातुन (USSR) फुटून कझाकस्तान हा स्वतंत्र देश झाला.

२००६: अंतराळवीर सुनिता विल्यम यांनी एका सोबत्यासोबत अंतराळयानाच्या बाहेर जाऊन ७ तास ३१ मिनिटात विद्युत प्रणालीची दुरुस्ती केली.

१६ डिसेंबर – जन्म

१७७०: कर्णबधिर संगीतकार लुडविग व्हान बीथोव्हेन यांचा जन्म. (मृत्यू: २६ मार्च १८२७)

१७७५: इंग्लिश लेखिका जेन ऑस्टीन यांचा जन्म. (मृत्यू: १८ जुलै १८१७)

१८८२: इंग्लिश क्रिकेट खेळाडू जॅक हॉब्ज यांचा जन्म. (मृत्यू: २१ डिसेंबर १९६३)

१९१७: विज्ञान कथालेखक आणि संशोधक सर आर्थर सी. क्लार्क यांचा जन्म. (मृत्यू: १९ मार्च २००८)

१६ डिसेंबर – मृत्यू

१९६०: मराठी कोशकार आणि लेखक चिंतामण गणेश कर्वे यांचे निधन. (जन्म: ४ फेब्रुवारी १८९३)

१९६५: इंग्लिश लेखक आणि नाटकाकर डब्ल्यू. सॉमरसेट मॉम यांचे निधन. (जन्म: २५ जानेवारी १८७४)

१९८०: केंटुकी फ्राईड चिकन (KFC) चे संस्थापक कर्नल सँडर्स यांचे निधन. (जन्म: ९ सप्टेंबर १८९०)

२००२: सर्कस सम्राट काशिनाथ सखाराम तथा बंडोपंत देवल निधन.

२००४: नाट्य आणि चित्रपट अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे निधन. (जन्म: ३ नोव्हेंबर १९५४)