27 December

0
201

२७ डिसेंबर – घटना

१९११: कॉंग्रेस अधिवेशनात जन गण मन राष्ट्रगीत पहिल्यांदा गायले गेले.

१९१८: बृहद पोलंडमध्ये पोलिश लोकांचे जर्मन सत्तेविरूद्ध बंड पुकारले गेले.

१९४५: २८ देशांनी एकत्रित जागतिक बँक (World Bank) आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund) स्थापन केले.

१९४५: कोरिया देशाची फाळणी झाली.

१९४९: इंडोनेशिया देशाला नेदरलँड्स पासून स्वातंत्र्य मिळाले.

१९७५: बिहारमधील (हल्लीचे झारखंड) चासनाला येथे कोळशाच्या खाणीत अचानक पाणी शिरून झालेल्या दुर्घटनेत ३७२ कामगार ठार झाले.

१९७८: ४० वर्षाच्या हुकुमशाहीनंतर स्पेन प्रजासत्ताक बनले.

२००४: मॅग्नेटर एसजीआर १८०६-२० ला स्फोट झाल्यामुळे उत्सर्जित किरण पृथ्वीला पोहोचते.

२००७: पाकिस्तानातील माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची गोळी मारून हत्या करण्यात आली.

२७ डिसेंबर – जन्म

१५७१: जर्मन खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ योहान्स केप्लर यांचा जन्म. (मृत्यू: १५ नोव्हेंबर १६३०)

१६५४: स्विस गणितज्ञ जेकब बर्नोली यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑगस्ट १७०५)

१७७३: इंग्लंडचे शास्त्रज्ञ, शोधक आणि राजकारणी जॉर्ज केली यांचा जन्म.

१७९७: उर्दू कवी मिर्झा गालिब यांचा आग्रा येथे जन्म. (मृत्यू: १५ फेब्रुवारी १८६९)

१८२२: रेबीज किंवा हैड्रोफोबिया रोगावर लस शोधणारें रसायनशास्त्रज्ञ लुई पाश्चर यांचा जन्म. (मृत्यू: २८ सप्टेंबर १८९५)

१८९८: विदर्भातील सामाजिक नेते, शिक्षण प्रसारक आणि केंद्रीय कृषिमंत्री पंजाबराव देशमुख यांचा जन्म. (मृत्यू: १० एप्रिल १९६५)

१९२७: उत्तराखंडचे पहिले मुख्यमंत्री नित्यानंद स्वामी यांचा जन्म. (मृत्यू: १२ डिसेंबर २०१२)

१९४४: हिन्दी चित्रपट आणि टीव्ही अभिनेता विजय अरोरा यांचा जन्म. (मृत्यू: २ फेब्रुवारी २००७)

१९६५: हिंदी चित्रपट अभिनेता सलमान खान यांचा जन्म.

१९८६: दोन वेळा वर्ल्ड आणि ऑलिम्पिक चॅम्पियन बनणारी जमैका ची धावपटू शैली एन फ्रेजर प्राईस यांचा जन्म.

२७ डिसेंबर – मृत्यू

१९००: ब्रिटीश स्थापत्यशास्त्री विल्यम जॉर्ज आर्मस्ट्रॉंग यांचे निधन.

१९२३: फ्रेंच वास्तुरचनाकार, आयफेल टॉवरचे निर्माते गुस्ताव अलेक्झांद्रे आयफेल यांचे निधन. (जन्म: १५ डिसेंबर १८३२)

१९४९: भालकर भोपटकर यांचे निधन.

१९६५: मराठी साहित्यिक, ज्ञानोदयचे संपादक देवदत्त नारायण टिळक यांचे निधन.

१९७२: कॅनडाचे १४ वे पंतप्रधान आणि नोबेल पारितोषिक विजेते लेस्टर बी. पिअर्सन यांचे निधन. (जन्म: २३ एप्रिल १८९७)

१९९७: मराठी भावगीत गायिका मालती पांडे-बर्वे यांचे निधन.

२००२: आसामी लोकगीत गायिका प्रतिमा बरुआ-पांडे यांचे निधन.

२००७: पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनझीर भूट्टो यांची हत्या. (जन्म: २१ जून १९५३)

२०१३: अभिनेता फारुख शेख यांचे निधन.