29 December

0
187

२९ डिसेंबर – घटना

१९३०: सर मुहम्मद इकबाल यांनी दोन राष्ट्र सिद्धांत तसेच पाकिस्तानच्या निर्मितीचा दृष्टीकोन मांडला.

१९५९: नोबेल पारितोषिक विजेते रिचर्ड फाइनमॅन यांनी CALTECH येथे There is plenty of room at the bottom हे प्रसिद्ध भाषण दिले. ही nanotechnology ची सुरुवात मानली जाते.

१९५९: पोर्तुगालमधील लिस्बन येथे भुयारी रेल्वेची सुरूवात झाली.

२९ डिसेंबर – जन्म

१८००: रबरावरील व्हल्कनायझेशन ही प्रक्रिया शोधणारे अमेरिकन संशोधक चार्ल्स गुडईयर यांचा जन्म. (मृत्यू: १ जुलै १८६०)

१८०८: अमेरिकेचे १७ वे राष्ट्राध्यक्ष अँड्र्यू जॉन्सन यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जुलै १८७५)

१८०९: ब्रिटीश पंतप्रधान विल्यम ग्लँडस्टोन यांचा जन्म.

१८४४: कॉंग्रेसचे पहिले अध्यक्ष व्योमकेशचंद्र बनर्जी यांचा जन्म.

१९००: मास्टर दिनानाथ मंगेशकर यांचा जन्म. (मृत्यू: २४ एप्रिल १९४२)

१९०४: ज्ञानपीठ विजेते कन्नड लेखक व कवी कुपल्ली वेंकटप्पागौडा पुट्टप्पा उर्फ कुवेम्पू यांचा जन्म. (मृत्यू: ११ नोव्हेंबर १९९४)

१९१७: निर्माते-दिगदर्शक रामानंद सागर यांचा जन्म. (मृत्यू: १२ डिसेंबर २००५)

१९२१: फेडरल रिपब्लिक ऑफ युगोस्लाव्हियाचे पहिले अध्यक्ष डोब्रिका कोसिक यांचा जन्म. (मृत्यू: १८ मे २०१४)

१९४२: सुपरस्टार राजेश खन्ना यांचा जन्म. (मृत्यू: १८ जुलै २०१२)

१९६०: ओस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड बून यांचा जन्म.

१९७४: अभिनेत्री ट्विंकल खन्ना यांचा जन्म.

२९ डिसेंबर – मृत्यू

१९६७: गायक, पंडित ओंकारनाथ ठाकुर यांचे निधन. (जन्म: २४ जून १८९७)

१९८६: इंग्लंडचे पंतप्रधान हॅरॉल्ड मॅकमिलन यांचे निधन. (जन्म: १० फेब्रुवारी १८९४)

१९७१: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी दादासाहेब गायकवाड यांचे निधन.

२०१२: इंग्लिश क्रिकेटपटू व समालोचक टोनी ग्रेग यांचे निधन. (जन्म: ६ ऑक्टोबर १९४६)

२०१३: भारतीय लेखक आणि अनुवादक जगदीश मोहंती यांचे निधन. (जन्म: १७ फेब्रुवारी १९५१)

२०१४: भारतीय-हाँगकाँगचे व्यापारी हरी हरिलेला यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १९२२)

२०१५: पंजाबचे २५ वे राज्यपाल ओमप्रकाश मल्होत्रा यांचे निधन. (जन्म: ६ ऑगस्ट १९२२)