6 January – दिनविशेष

0
202

घटना

१६६५: शिवाजी महाराजांनी सूर्यग्रहणाच्या निमित्ताने राजमाता जिजाऊ व सोनोपंत विश्वनाथ डबीर यांची सुवर्णतुला केली.

१६७३: कोंडाजी फर्जद यांनी फक्त ६० मावळ्यांच्या मदतीने पन्हाळा किल्ला जिंकला आणि महाराजांचे १३ वर्षाचे स्वप्न पूर्ण झाले.

१८३२: पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी इंग्रजी व मराठीतील पहिले साप्ताहिक वृत्तपत्र दर्पण सुरू केले.

१८३८: सॅम्युअल मॉर्स यांनी तारयंत्राचा शोध लावला.

१९०७: मारिया माँटेसरी यांनी पहिली माँटेसरी शाळा सुरूकेली. त्यांच्या शाळांमुळे पूर्वप्राथमिक शिक्षणात आमूलाग्र बदल झाला.

१९१२: न्यू मेक्सिको हे अमेरिकेचे ४७वे राज्य बनले.

१९२४: राजकारणात भाग न घेणे व रत्‍नागिरी जिल्ह्यातच राहणे या अटींवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मठेपेतुन सशर्त मुक्तता

१९२९: गोरगरिब व रुग्णांची सेवा करण्यासाठी मदर तेरेसा यांचे कोलकाता येथे आगमन.

१९४४: दुसरे महायुद्ध – रशियन सैन्य पोलंडमध्ये शिरले.

२०१६: उत्तर कोरिया कडून भूमिगत परमाणु परीक्षण.

जन्म

१७४५: बलूनच्यासहाय्याने आकाशात उडण्याचे प्रयोग करणाऱ्या जाक्कास एलियन माँटगोल्फिएर यांचा जन्म.

१८१२: मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म. (मृत्यू: १८ मे १८४६)

१८२२: उत्खनन करून ट्रॉय आणि मायसेनी या नगरीचा शोध लावणाऱ्या हेन्रीचा श्लीमन यांचा जन्म.

१८६८: आधुनिक संतकवी गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ दासगणू महाराज यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९६२)

१८८३: लेबनॉनमधे जन्मलेले अमेरिकन कवी, लेखक व कलाकार खलील जिब्रान यांचा जन्म. (मृत्यू: १० एप्रिल १९३१)

१९२७: प्रवासवर्णनकार, कथाकार आणि विनोदी लेखक रमेश मंत्री यांचा जन्म. (मृत्यू: १९ जून १९९७)

१९२८: नाटककार, चित्रपटकथालेखक, पत्रकार व साहित्यिक विजय तेंडुलकर यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे २००८ – पुणे, महाराष्ट्र)

१९३१: पर्यावरण क्षेत्रातील शा’स्त्रज्ञ, महाराष्ट्र असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्सचे (आघारकर रिसर्च इन्स्टिट्युट) अध्यक्ष डॉ. आर. डी. देशपांडे यांचा जन्म.

१९५५: विनोदी अभिनेते व पटकथालेखक रोवान अ‍ॅटकिन्सन यांचा जन्म.

१९५९: भारतीय क्रिकेटपटू कपिलदेव निखंज यांचा जन्म.

१९६६: सुप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांचा जन्म.

मृत्यू

१७९६: महादजी शिंदे यांचे सेनापती जिवबा दादा बक्षी यांचे निधन.

१८४७: दाक्षिणात्य संगीतकार त्यागराज यांचे निधन. (जन्म: ४ मे १७६७)

१८५२: अंधांना उपयोगी पडणाऱ्या ब्रेल लिपीचे जनक व शिक्षक लुई ब्रेल यांचे निधन. (जन्म: ४ जानेवारी १८०९)

१८८४: जनुकांची (genes) संकल्पना मांडणारा जर्मन जीवशास्त्रज्ञ ग्रेगोर मेंडेल यांचे निधन. (जन्म: २० जुलै १८२२)

१८८५: आधुनिक हिंदी साहित्याचे जनक भारतेंदू हरीश्चंद यांचे निधन. (जन्म: ९ सप्टेंबर १८५०)

१९१८: जर्मन गणितज्ञ जी. कँटर यांचे निधन. (जन्म: ३ मार्च १८४५)

१९१९: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकेचे २६वे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रूझवेल्ट यांचे निधन. (जन्म: २७ आक्टोबर १८५८)

१९७१: जादूगार प्रफुल्लचंद्र तथा पी. सी. सरकार यांचे निधन. (जन्म: २३ फेब्रुवारी १९१३)

१९८१: स्कॉटिश लेखक ए. जे. क्रोनिन यांचे निधन. (जन्म: १९ जुलै १८९६)

१९८४: महामहोपाध्याय, वैदिक साहित्याचे अभ्यासक व मराठी कोशकार विद्यानिधी सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव यांचे निधन. (जन्म: १ फेब्रुवारी १८८४)

२०१०: लेखक आणि इंग्रजीचे प्राध्यापक प्रल्हाद इरबाजी सोनकांबळे यांचे निधन. (जन्म: १६ जुलै १९४३)

२०१७: ओम पुरी (वय ६६ वर्ष) भारतीय अभिनेते