11 February

0
195

११ फेब्रुवारी – घटना

६६०: सम्राट जिम्मु यांनी जपानचे राष्ट्र निर्माण केले.

१६६०: औरंगजेबाने मुख्तारखान याला दख्खनची जबाबदारी देऊन औरंगाबाद येथे पाठवले.

१७५२: पेनसिल्व्हानिया हॉस्पिटल या अमेरिकेतील पहिल्या हॉस्पिटलचे बेंजामिन फ्रँकलिनच्या हस्ते उद्‌घाटन झाले.

१८१८: इंग्रजांनी अजिंक्यतारा किल्ला ताब्यात घेतला.

१८२६: लंडन विद्यापीठाची स्थापना.

१८३०: मुंबईचे हंगामी राज्यपाल सर सिडने ब्रेकनिथ यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना झाली.

१९११: हेन्र्‍री पिके याने हंटर जातीच्या विमानातून भारतातील पहिली एअर मेल अलाहाबादवरुन नैनी या १० किलोमीटर अंतरावरील गावाला वाहून नेली.

१९२९: पोप पायस (११ वा) आणि बेनिटो मुसोलिनी यांच्यात झलेल्या लॅटेरान ट्रिटी या विशेष करारानुसार व्हॅटिकन सिटी हे शहर राष्ट्र इटालीतुन वेगळे करण्यात आले.

१९७९: पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.

१९९०: २७ वर्षांच्या तुरुंगवासानंतर नेल्सन मंडेला यांची तुरूंगातुन सुटका.

१९९९: मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार इलियाराजा यांना जाहीर.

२०११: १८ दिवसांच्या जनआंदोलनानंतर होस्‍नी मुबारक यांना इजिप्तची सत्ता सोडणे भाग पडले.

११ फेब्रुवारी – जन्म

१८००: छायाचित्रणकलेचा पाया घालणारे हेन्‍री फॉक्स टॅलबॉट यांचा जन्म. (मृत्यू: १७ सप्टेंबर १८७७)

१८३९: अमेरिकन संशोधक अल्मोन स्ट्राउजर यांचा जन्म. (मृत्यू: २६ मे १९०२)

१८४७: अमेरिकन संशोधक आणि उद्योजक थॉमस अल्वा एडिसन यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑक्टोबर १९३१)

१९३७: ऑस्ट्रेलियन क्रिकेटर बिल लॉरी यांचा जन्म.

१९४२: कादंबरीकार, लघुकथालेखिका आणि कवयित्री गौरी देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू: १ मार्च २००३)

११ फेब्रुवारी – मृत्यू

१६५०: फ्रेन्च तत्त्वज्ञ व गणितज्ञ रेने देकार्त यांचे निधन. (जन्म: ३१ मार्च १५९६)

१९४२: प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक आणि बजाज उद्योगसमुहाचे प्रणेते जमनालाल बजाज यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १८८४)

१९६८: तत्त्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्री, इतिहासकार, पत्रकार, राजकीय नेते पण्डित दीनदयाळ उपाध्याय यांची अज्ञात मारेकर्‍याकडुन हत्या. (जन्म: २५ सप्टेंबर १९१६)

१९७७: भारताचे ५ वे राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांचे निधन. (जन्म: १३ मे १९०५)

१९९३: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, संवादलेखक, पटकथाकार व कवी सईद अमीर हैदर कमाल नक्‍वी ऊर्फ कमाल अमरोही यांचे निधन. (जन्म: १७ जानेवारी १९१८)