२७ फेब्रुवारी – घटना
१८४४: डॉमिनिकन रिपब्लिकला हैतीपासुन स्वातंत्र्य मिळाले.
१९००: ब्रिटन मधे मजूर पक्षाची (Labour Party) ची स्थापना.
१९५१: अमेरिकेच्या राज्यघटनेत २१ वा बदल करण्य़ात आला ज्यायोगे एका व्यक्तिच्या राष्ट्राध्यक्षपदाचा जास्तीत जास्त कालावधी ८ वर्षे असा करण्यात आला.
१९९९: पंधरा वर्षे सुरू असलेली लष्करी राजवट संपुष्टात येऊन नायजेरियात अध्यक्षीय निवडणूक.
२००१: जमिनीवरून आकाशातील अनेक लक्ष्यांवर मारा करू शकणार्या आकाश या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची चंडीपूर तळावर यशस्वी चाचणी.
२००२: मुस्लिम जमावाने अयोध्येहुन परत येणाऱ्या ५९ हिंदू यात्रेकरूंना गुजरातेतील गोध्रा येथे रेल्वेच्या डब्यात जिवंत जाळले.
२७ फेब्रुवारी – जन्म
१८०७: अमेरिकन नाटककार व कवी एच. डब्ल्यू. लाँगफेलो यांचा जन्म. (मृत्यू: २४ मार्च १८८२)
१८९४: जर्मन रसायनशास्त्रज्ञ कार्ल श्मिट यांचा जन्म. (मृत्यू: १३ जून १८२२)
१८९९: इन्सुलिन चे शोधक जीवरसायनशास्त्रज्ञ चार्ल्स हर्बर्ट बेस्ट यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मार्च १९७८)
१९१२: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, कवी व नाटककार विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म, म्हणून आज मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. (मृत्यू: १० मार्च १९९९)
१९२६: मराठी व हिन्दी लेखिका ज्योत्स्ना देवधर यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी २०१३)
१९३२: ब्रिटिश-अमेरिकन अभिनेत्री एलिझाबेथ टेलर यांचा जन्म. (मृत्यू: २३ मार्च २०११)
१९८६: भारतीय हॉकी खेळाडू संदीप सिंग यांचा जन्म.
२७ फेब्रुवारी – मृत्यू
१८९२: फॅशन कंपनी लुई वूत्तोन चे डिझायनर लुई वूत्तोन यांचे निधन. (जन्म: ४ ऑगस्ट १८२१)
१८९४: जर्मन रसायनशास्त्रज्ञ कार्ल श्मिट यांचे निधन. (जन्म: १३ जून १८२२)
१९८७: अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार व संपादक अदि मर्झबान यांचे निधन.
१९३१: थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांनी अलाहबादच्या पार्क मध्ये पोलिसांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देतांना शेवटची गोळी शिल्लक असल्यामुळे स्वता:च्याच कानशिलावर गोळी मारून प्राण मातृभूमीला अर्पण केले. (जन्म: २३ जुलै १९०६)
१९३६: नोबेल पारितोषिक विजेते रशियन शास्त्रज्ञ इव्हान पेट्रोव्हिच पाव्हलॉव्ह यांचे निधन. (जन्म: २६ सप्टेंबर १८४९)
१९५६: भारतीय वकील आणि राजकारणी गणेश वासुदेव मावळणकर यांचे निधन. (जन्म: २७ नोव्हेंबर १८८८)
१९९७: गीतकार श्यामलाल बाबू राय ऊर्फ इंदीवर यांचे निधन.
२०१०: भारतीय शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर १९१६)