1 March

0
177

१ मार्च – घटना

१५६५: रिओ डी जानिरो शहराची स्थापना झाली.
१८०३: ओहायो हे अमेरिकेचे १७वे राज्य बनले.
१८७२: यलो स्टोन नॅशनल पार्क या जगातील पहिल्या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झाली.
१८७३: ई. रेमिंगटोन आणि सन्स कंपनी ने पहिल्या व्यावहारिक टंकलेखन यंत्र (टाईपरायटर) चे उत्पादन सुरू होते.
१८९३: अभियंते निकोला टेस्ला यांनी पहिल्या रेडिओ चे प्रात्यक्षिक दाखवले.
१८९६: हेन्री बॅक्वरल अणुकिरणोत्सर्जीचे किडणे शोधले.
१९०१: ऑस्ट्रेलियन लष्कर स्थापन करण्यात आले.
१९०७: टाटा आयर्न अँड स्टील कंपनी ची स्थापना झाली.
१९२७: रत्‍नागिरीस गांधीजींनी सावरकरांची भेट घेउन चर्चा केली.
१९३६: अमेरिकेतील महाकाय हूव्हर धरण बांधून पूर्ण झाले.
१९४६: बँक ऑफ इंग्लंड चे राष्ट्रीयीकरण झाले.
१९४७: आंतरराष्ट्रीय नाणे निधिच्या कामकाजास सुरूवात झाली.
१९४८: गुवाहाटी उच्‍च न्यायालयाची स्थापना झाली.
१९५४: प्रशांत महासागरातील बिकिनी अटोल येथे अमेरिकेने हायड्रोजन बॉम्बची दुसरी चाचणी घेतली. हा स्फोट हिरोशिमाच्या स्फोटापेक्षा ६०० पट जास्त शक्तिशाली होता.
१९६१: अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी पीस कॉर्पस स्थापन करते.
१९६१: युगांडा मध्ये लोकशाही गणतंत्र सुरु होऊन पहिल्या निवडणुकी झाल्या.
१९९२: बोस्‍निया व हेर्झेगोविनाला युगोस्लाव्हियापासून स्वातंत्र्य मिळाले.
१९९८: एकूण १ अब्ज डॉलर पेक्षा जास्त कमाई करणारा टायटॅनिक हा पहिला चित्रपट झाला.
१९९८: दाक्षिणात्य गायिका एम. एस. सुब्बलक्ष्मी यांना भारतरत्‍न हा सर्वोच्‍च नागरी सन्मान राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
२००२: पेसेटा हे चलन सोडून देऊन स्पेनने यूरो हे चलन स्वीकारले.

 

१ मार्च – जन्म

१९२२: महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाभणारे आधुनिक महामानव डॉ. नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांचा अलिबाग, रायगड येथे जन्म.
१९२२: नोबेल पारितोषिक विजेते इस्त्रायलचे ५ वे पंतप्रधान यित्झॅक राबिन यांचा जन्म. (मृत्यू: ४ नोव्हेंबर १९९५)
१९३०: उद्योगपती राम प्रसाद गोएंका यांचा जन्म. (मृत्यू: १४ एप्रिल २०१३)
१९४४: पश्चिम बंगाल चे ७वे मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचा जन्म.
१९६८: क्रिकेटपटू सलील अंकोला यांचा जन्म.
१९८०: पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद अफ्रिदी यांचा जन्म.

१ मार्च – मृत्यू

१९५५: महाराष्ट्रातील धर्मसुधारणावादी श्रेष्ठ संस्कृत पंडित, संस्कृतमीमांसाकोशाचे संपादक नारायण सदाशिव मराठे तथा केवलानंद सरस्वती याचं निधन. (जन्म: ८ डिसेंबर १८७७)
१९८९: महाराष्ट्राचे ५वे आणि ९वे मुख्यमंत्री, सहकारी साखर कारखानदारीचे आधारस्तंभ वसंतदादा पाटील याचं निधन. (जन्म: १३ नोव्हेंबर १९१७)
१९९१: पोलाराईड कॉर्पोरेशन चे सहसंस्थापक एडविन एच लँड यांचे निधन. (जन्म: ७ मे १९०९)
१९९४: निर्माते, दिग्दर्शक मनमोहन देसाई यांनी आत्महत्या केली (जन्म: २६ फेब्रुवारी १९३७)
१९९९: वेदविद्येचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक, वेदांती पंडित दत्तात्रयशास्त्री धुंडिराज तथा दत्तमहाराज कवीश्वर याचं निधन. (जन्म: १३ फेब्रुवारी १९१०)
२००३: कादंबरीकार, लघुकथालेखिका आणि कवयित्री गौरी देशपांडे याचं निधन. (जन्म: ११ फेब्रुवारी १९४२)
२०१६: AOL चे सहसंस्थापक जिम किमसे यांचे निधन. (जन्म: १५ सप्टेंबर १९३९)