3 March

0
172

३ मार्च – घटना

इ. स. ७८: शालिवाहन शकास प्रारंभ झाला.
१८४५: फ्लोरिडा हे अमेरिकेचे २७ वे राज्य बनले.
१८६५: हाँगकाँग अँड शांघाय बँकिंग कार्पोरेशन (HSBC) ची स्थापना झाली.
१८८५: अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनी (AT &T) ची स्थापना झाली.
१९२३: टाईम मॅगझिनचे पहिले मासिक प्रकाशित झाले.
१९३०: नाशिक येथील कला राम मंदिरात सर्वांना प्रवेश मिळण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला.
१९३८: सौदी अरेबिया मध्ये खनिज तेलाचा शोध लागला.
१९३९: महात्मा गांधी यांनी ब्रिटिश सरकार च्या हुकूमशाही नियमा विरुद्ध मुंबईमध्ये येथे उपोषण सुरू केले.
१९४३: दुसरे महायुद्ध – लंडनमधे बॉम्बविरोधी आश्रयस्थानात घुसताना झालेल्या चेंगराचेंगरीत १४३ ठार.
१९६६: डॉ. धनंजयराव गाडगीळ पुणे विद्यापीठाचे ६वे कुलगुरू झाले.
१९७३: भारताच्या ओडिशा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू.
१९८६: ऑस्ट्रेलिया कायदा १९८६ प्रमाणे, ऑस्ट्रेलिया देश युनायटेड किंगडम पासुन पूर्णपणे स्वतंत्र झाला.
१९९४: जयपूर येथील गिटारवादक पंडित विश्वमोहन भट यांना ग्रॅमी पुरस्कार प्रदान केला.
२००३: महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणार्‍या शरच्‍चंद्र चटोपाध्याय पुरस्कारासाठी ज्येष्ठ लेखिका डॉ. सरोजिनी वैद्य यांची निवड झाली.
२००५: स्टीव्ह फॉसेट यांनी ग्लोबल फायर या विमानातून एकट्याने आणि परत इंधन न भरता ६७ तासांत पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.
२०१५: २० डिसेंबर २०१३ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने ३ मार्च हा जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.

 

३ मार्च – जन्म

१८३९: टाटा उद्योग समुहाचे संस्थापक भारतीय उद्योगपती जमशेदजी टाटा यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे १९०४)
१८४५: जर्मन गणितज्ञ जॉर्ज कँटर यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी १९१८)
१८४७: टेलिफोनचा जनक अॅलेक्झांडर ग्राहम बेल यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑगस्ट १९२२)
१९२०: किर्लोस्कर मासिकाचे संपादक मुकुंद शंकरराव किर्लोस्कर यांचा जन्म.
१९२३: इतिहासकार आणि ललित लेखक प्रा. सदाशिव नथोबा आठवले यांचा जन्म.
१९२६: संगीतकार रवि शंकर शर्मा उर्फ रवि यांचा जन्म. (मृत्यू: ७ मार्च २०१२)
१९२८: कवी आणि लेखक पुरुषोत्तम पाटील यांचा जन्म.
१९३९: भारतीय कसोटी क्रिकेटपटू एम. एल. जयसिंहा यांचा जन्म. (मृत्यू: ६ जुलै १९९९)
१९५५: विनोदी अभिनेता जसपाल भट्टी यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑक्टोबर २०१२)
१९६७: गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांचा जन्म.
१९७०: पाकिस्तानी क्रिकेटपटू इंझमाम उल हक यांचा जन्म.
१९७७: भारताचा चौथा ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांचा जन्म.

३ मार्च – मृत्यू

१७०३: इंग्लिश वैज्ञानिक रॉबर्ट हूक यांचे निधन. (जन्म: १८ जुलै १६३५)
१७०७: सहावा मोघल सम्राट औरंगजेब यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १६१८)
१९१९: कादंबरीकार हरी नारायण आपटे यांचे निधन. (जन्म: ८ मार्च १८६४)
१९२४: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकीचे २८वे राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन यांचे निधन.
१९६५: पार्श्वगायिका आणि अभिनेत्री अमीरबाई कर्नाटकी यांचे निधन.
१९६७: माजी अर्थमंत्री आणि कर्तबगार प्रशासक स. गो. बर्वे यांचे निधन.
१९८२: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते उर्दू शायर रघुपती सहाय उर्फ फिरक गोरखपुरी यांचे निधन. (जन्म: २८ ऑगस्ट १८९६)
१९९५: तबलावादक पं. निखील घोष यांचे निधन.
२०००: मराठी चित्रपट अभिनेत्री रंजना देशमुख यांचे निधन.