१५ मार्च – घटना
१४९३: भारत शोधल्याच्या आनंदात कोलंबस पहिल्या भारत शोध मोहिमेवरुन स्पेनला परतला. प्रत्यक्षात तो भारतात पोहोचलाच नव्हता तर वेस्ट इंडिजवरुन परत गेला होता.
१५६४: मुघल सम्राट अकबर याने हिंदूंवरील जिझिया कर रद्द केला.
१६८०: शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र राजाराम यांचा ताराबाई या प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी विवाह.
१८२०: मेन हे अमेरिकेचे २३ वे राज्य बनले.
१८२७: टोरांटो विद्यापीठाची स्थापना झाली.
१८३१: मुंबई येथे गणपत कृष्णाजी यांनी मराठीतील पहिले छापील पंचांग विक्रीला सुरु झाले.
१८७७: इंग्लंड व ऑस्ट्रेलियात जगातील पहिला अधिकृत क्रिकेट कसोटी सामना सुरू झाला.
१८९२: लिव्हरपूल एफ.सी. ची स्थापना झाली.
१९०६: रोल्स रॉईस या अलिशान कार कंपनीची सुरवात झाली.
१९१९: हैद्राबादच्या उस्मानिया विद्यापीठाचे उद्घाटन झाले.
१९३९: दुसरे महायुद्ध – जर्मनीने झेकोस्लोव्हाकिया गिळंकृत केले.
१९५६: ब्रॉडवेवरील मार्क हेलिंगर थिएटर येथे माय फेअर लेडी चा पहिला प्रयोग झाला.
१९६१: ब्रिटिश राष्ट्रकुलातून दक्षिण अफ्रिका बाहेर पडली.
१९८५: symbolics.com या इंटरनेट वरील पहिल्या डोमेन नावाची नोंद झाली.
१९९०: सोविएत संघाने लिथुआनियाचे स्वातंत्र्य नाकारले.
२००१: भारतीय क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांनी ऑस्ट्रेलिया विरूद्ध कसोटी सामन्यात २८१ धावा काढल्या.
२०११: सीरियन युद्ध सुरु झाले.
१५ मार्च – जन्म
१७६७: अमेरिकेचे ७ वे राष्ट्राध्यक्ष अँड्र्यू जॅक्सन यांचा जन्म. (मृत्यू: ८ जून १८४५)
१८६०: प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लसीचा शोध लावणारे रशियन सूक्ष्मजीवशास्त्र डॉ. वाल्डेमर हाफकिन यांचा मुंबई येथे जन्म. (मृत्यू: २६ ऑक्टोबर १९३०)
१८६६: पेपर क्लिप चे शोधक जॉन वालेर यांचा जन्म. (मृत्यू: १४ मार्च १९१०)
१९०१: पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते कुस्ती प्रशिक्षक विजयपाल लालाराम उर्फ गुरु हनुमान यांचा जन्म. (मृत्यू: २४ मे १९९९)
१५ मार्च – मृत्यू
ख्रिस्त पूर्व ४४: रोमन सिनेटमध्ये मर्कस जुनियस ब्रुटस, डेसिमस जुनियस ब्रुटस व इतर सेनेटरांनी रोमन सम्राट ज्यूलियस सीझर यांची हत्या केली.
१९३७: रंगभूमीवरील अभिनेते आणि गायक बापूराव पेंढारकर यांचे निधन. (जन्म: १० डिसेंबर १८९२)
१९९२: हिंदी आणि उर्दू कवी डॉ. राही मासूम रझा यांचे निधन.
२०००: विचारवंत आणि कलासमीक्षक लेडी राणी मुखर्जी यांचे निधन.
२००२: इंडियन नॅशनल थिएटरचे संस्थापक दामुभाई जव्हेरी यांचे निधन.
२००३: मुंबईतील कायदेतज्ज्ञ रवींद्रनाथ बॅनर्जी यांचे निधन.
२०१३: डॉ. रेड्डी प्रयोगशाळेचे स्थापक डॉ. काल्लाम अंजी रेड्डी यांचे निधन. (जन्म: १ फेब्रुवारी १९३९)
२०१५: भारतीय लेखक नारायण देसाई यांचे निधन. (जन्म: २४ डिसेंबर १९२४)