8 April

0
151

८ एप्रिल – घटना – दिनविशेष

१८३८: द ग्रेट वेस्टर्न हे वाफेचे इंजिन असलेले जहाज इंग्लंडमधील ब्रिस्टॉल येथून निघून पंधरा दिवसांनी न्यूयॉर्क येथे पोचले. अटलांटिक महासागर पार करणारी ही पहिली आगबोट.
१९११: डच भौतिकशास्त्रज्ञ हाइक ओन्नेस यांनी अतिसंवाहकतेचा शोध लावला.
१९२१: आचार्य विनोबा भावे यांनी पवनार आश्रमाची स्थापना वर्धा येथे केली.
१९२९: भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीतील सेंट्रल असेंब्लीत बॉम्बस्फोट केला.
१९५०: भारत आणि पाकिस्तान मध्ये लयाकत-नेहरु करार झाला.
१९९३: मॅसेडोनियाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रात सामील झाले
२००५: पोप जॉन पॉल (दुसरे) यांच्या अंत्ययात्रेत अंदाजे ४० लाख लोक सहभागी झाले.

८ एप्रिल – जन्म – दिनविशेष

१९२४: शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ ऊर्फ कुमार गंधर्व यांचा जन्म. (मृत्यू: १२ जानेवारी १९९२)
१९२८: नामवंत मराठी साहित्यिक, स्वामीकार रणजित देसाई यांचा जन्म. (मृत्यू: ६ मार्च १९९२)
१९३८: संयुक्त राष्ट्रांचे ७ वे प्रधान सचिव कोफी अन्नान यांचा जन्म.
१९७९: भारतीय गायक-गीतकार अमित त्रिवेदी यांचा जन्म.

८ एप्रिल – मृत्यू – दिनविशेष

१८५७: १८५७ च्या बंडातील स्वातंत्र्यवीर मंगल पांडे यांना फाशीच्या शिक्षेने मृत्यू. (जन्म: १९ जुलै १८२७)
१८९४: वंदे मातरम् या राष्ट्रगीताचे कवी, निबंधकार, कादंबरीकार, तत्त्वज्ञ, भाषाशास्त्रज्ञ, धर्ममिमांसक आणि सुधारक बंकिमचंद्र यादावचंद्र चटर्जी यांचे निधन. (जन्म: २७ जून १८३८)
१९०६: अल्झायमरच्या आजाराने निदान झालेल्या पहिल्या व्यक्ती एग्स्टे डिटर यांचे निधन. (जन्म: १६ मे १८५०)
१९५३: उद्योगपती वालचंद हिराचंद दोशी यांचे निधन. (जन्म: २३ नोव्हेंबर १८८२)
१९७३: स्पॅनिश चित्रकार आणि शिल्पकार पाब्लो पिकासो यांचे निधन. (जन्म: २५ ऑक्टोबर १८८१)
१९७४: मराठी रंगभूमीवरील कलाकार नानासाहेब फाटक यांचे निधन. (जन्म: २४ जून १८९९)
१९९९: कामगार नेते, नर्मदा बचाव आंदोलनाच्या मेधा पाटकर यांचे वडील वसंत खानोलकर यांचे निधन.
२०१३: ब्रिटनच्या एकमेव महिला पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांचे निधन. (जन्म: १३ ऑक्टोबर १९२५)
२०१५: भारतीय पत्रकार आणि लेखक जयकानधन यांचे निधन. (जन्म: २४ एप्रिल १९३४)