९ एप्रिल – घटना – दिनविशेष
१८६७: रशियाकडून अलास्का हा प्रांत खरेदी करण्याच्या प्रस्तावास अमेरिकेत एक मताने मंजुरी मिळाली.
१९४०: दुसरे महायुद्ध – जर्मनीने नॉर्वे व डेन्मार्क पादाक्रांत केले.
१९६७: बोइंग-७६७ या विमानाने पहिले उड्डाण केले.
१९९४: सूक्ष्मजीवशास्त्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल शास्त्रज्ञ पी. एम. भार्गव यांना आर. डी. बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
१९९५: लता मंगेशकर यांना अवधरत्न आणि साहू सूरसन्मान प्रदान करण्यात आले.
९ एप्रिल – जन्म – दिनविशेष
१३३६: मंगोल सरदार तैमूरलंग यांचा जन्म. (मृत्यू: १८ फेब्रुवारी १४०५)
१७७०: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ थॉमस योहान सीबेक यांचा जन्म.
१८२८: समाजसुधारक गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांचा जन्म. (मृत्यू: २५ जुलै १८८०)
१८८७: पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक विष्णू गंगाधर तथा दादासाहेब केतकर यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑक्टोबर १९५०)
१८९३: बौद्धधर्माचे भाष्यकार आणि इतिहासकार राहुल सांकृत्यायन यांचा जन्म. (मृत्यू: १४ एप्रिल १९६३)
१९२५: अमेरिकन ज्योतिषी व लेखिका लिंडा गुडमन यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑक्टोबर १९९५)
१९३०: अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ एफ. अल्बर्ट कॉटन यांचा जन्म.
१९४८: हिंदी चित्रपट अभिनेत्री जया भादुरी यांचा जन्म.
९ एप्रिल – मृत्यू – दिनविशेष
इ.स. पूर्व ५८५: जपानचा पहिला सम्राट सम्राट जिम्मू यांचे निधन. (जन्म: १३ फेब्रुवारी इ. स. पूर्व ७११)
१६२६: इंग्लिश तत्त्ववेत्ते व मुत्सद्दी सर फ्रँन्सिस बेकन यांचे निधन. (जन्म: २२ जानेवारी १५६१)
१६९५: पंडितकवी वामनपंडित यांनी भोगाव येथे समाधी घेतली.
१९९४: स्वातंत्र्यसैनिक, तेलंगणच्या लढ्याचे प्रवर्तक तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस चंद्र राजेश्वर राव यांचे निधन.
१९९८: महानुभाव पंथाचे अभ्यासक, विचारवंत व तत्त्वज्ञ, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विष्णू भिकाजी तथा वि. भि. कोलते यांचे निधन. (जन्म: २२ जून १९०८)
२००१: पत्रकार आणि स्तंभलेखक बेहराम काँट्रॅक्टर ऊर्फ बिझी बी यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर १९३०)
२००१: दलित साहित्यिक तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू शंकरराव खरात यांचे निधन. (जन्म: ११ जुलै १९२१)
२००९: हिंदी व बंगाली चित्रपट दिग्दर्शक निर्माते शक्ती सामंत यांचे निधन. (जन्म: १३ जानेवारी १९२६)
२००९: लोककलांचे अभ्यासक आणि गीतकार अशोकजी परांजपे यांचे निधन.