11 April

0
175

११ एप्रिल – घटना – दिनविशेष

 

१९१९: इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची स्थापना झाली.
१९७०: अपोलो-१३ यानाचे प्रक्षेपण झाले.
१९७९: युगांडाचे हुकूमशहा इदी अमीन सत्ता सोडून पळून गेले.
१९७६: ऍपल कंपनी चे ऍपल १ हे कॉम्पुटर तयार झाले.
१९८६: हॅलेचा धूमकेतू पृथ्वीच्या सर्वात जवळ येत साडेसहा कोटी किलोमीटर अंतरावरून गेला.
१९९२: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक भालजी पेंढारकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला.
१९९९: अग्नी-२ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली.

११ एप्रिल – जन्म – दिनविशेष

 

१७५५: कंपवाताचा मानवी मेंदूशी संबंध आहे हे सिद्ध करणारे शास्त्रज्ञ जेम्स पार्किन्सन यांचा जन्म. (मृत्यू: २१ डिसेंबर १८२४)
१७७०: ब्रिटनचे पंतप्रधान जॉर्ज कॅनिंग यांचा जन्म. (मृत्यू: ८ ऑगस्ट १८२७)
१८२७ : श्रेष्ठ समाजसुधारक तसेच श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची दास्याची मीमांसा करणारे क्रांतिकारक विचारवंत जोतिराव गोविंदराव फुले ऊर्फ महात्मा फुले यांचा जन्म. (मृत्यू: २८ नोव्हेंबर १८९०)
१८६९: कस्तुरबा गांधी यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी १९४४)
१८८७: चित्रकार जेमिनी रॉय यांचा जन्म. (मृत्यू: २४ एप्रिल १९७२)
१९०४: गायक आणि अभिनेते कुंदनलान सैगल यांचा जन्म. (मृत्यू: १८ जानेवारी १९४७)
१९०६: संस्कृत, प्राकृत, कोकणी या भाषांचे अभ्यासक डॉ. सुमित्र मंगेश कत्रे यांचा जन्म.
१९०८: सोनी कंपनी च्या सह्संस्थापक मसारू इबुका यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १९९७)
१९३७: लॉनटेनिस खेळाडू रामनाथन कृष्णन यांचा जन्म.
१९५१: अभिनेत्री रोहिणी हटंगडी यांचा जन्म.

११ एप्रिल – मृत्यू – दिनविशेष

 

१९२६: अमेरिकन वनस्पतिशास्त्रज्ञ आणि कृषितज्ज्ञ ल्यूथर बरबँक यांचे निधन. (जन्म: ७ मार्च १८४९)
१९७७: भारतीय लेखक आणि कार्यकर्ते फन्नीश्वर नाथ रेणू यांचे निधन. (जन्म: ४ मार्च १९२१)
२०००: कर्करोग संशोधन क्षेत्रातील अग्रणी शास्त्रज्ञ, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित कमल समर्थ ऊर्फ कमल रणदिवे यांचे निधन. (जन्म: ८ नोव्हेंबर १९१७)
२००३: टेक्सास इन्स्ट्रूमेंट चे स्थापक सीसिल हॉवर्ड ग्रीन यांचे निधन. (जन्म: ६ ऑगस्ट १९००)
२००९: भारतीय लेखक व नाटककार विष्णु प्रभाकर यांचे निधन. (जन्म: २१ जून १९१२)
२०१५: भारतीय लष्करचे जनरल लेफ्टनंट हनुतसिंग राठोड यांचे निधन.(जन्म: ६ जुलै १९३३)