२६ मे – घटना
१८९६: निकोलस (दुसरा) रशियाचा झार बनला.
१९७१: बांगलादेशातील सिल्हेट येथे पाकिस्तानी सैन्याने ७१ हिंदूंची कत्तल केली.
१९८६: युरोपियन समुदायाने (EU) नवीन ध्वज अंगीकारला.
१९८९: मुंबईजवळच्या न्हावा-शेवा बंदराचे उद्घाटन झाले.
१९९९: श्रीहरिकोटा येथून पी. एस. एल. व्ही. – सी. २ या धृवीय उपग्रहवाहकाने भारताचा आय. एस. एस. पी. ४ (ओशनसॅट), कोरियाचा किटसॅट व जर्मनीचा डी. एल. आर. – टबसॅट या तीन उपग्रहांना त्यांच्या कक्षेत यशस्वीरीत्या पोहोचवले.
२०१४: नरेंद्र मोदी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतली.
२६ मे – जन्म
१६६७: फ्रेन्च गणिती अब्राहम डी. मुआव्हर यांचा जन्म. (मृत्यू: २७ नोव्हेंबर १७५४)
१८८५: नाटककार, कवी व विनोदी लेखक राम गणेश गडकरी यांचा जन्म. (मृत्यू: २३ जानेवारी १९१९)
१९०२: नाटककार व साहित्यिक सदाशिव अनंत शुक्ल ऊर्फ कुमुदबांधव यांचा जन्म. (मृत्यू: २७ जानेवारी १९६८)
१९०६: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय कृषी संशोधक बेन्जामिन पिअरी पाल यांचा जन्म. (मृत्यू: १४ सप्टेंबर १९८९)
१९३०: भारतीय-ईराणी भाषेतील शब्दलेखक आणि समीक्षक करीम इमामी यांचा जन्म. (मृत्यू: ९ जुलै २००५)
१९३७: भारतीय अभिनेत्री आणि गायक मनोरमा यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑक्टोबर २०१५)
१९३८: भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता बी. बिक्रम सिंग यांचा जन्म. (मृत्यू: १२ मे २०१३)
१९४५: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑगस्ट २०१२)
१९६१: भारतीय-अमेरिकन दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथालेखक तारसेम सिंग यांचा जन्म.
१९६६: दक्षिण अफ्रिकेची धावपटू झोला बड यांचा जन्म.
२६ मे – मृत्यू
१७०३: विख्यात इंग्रजी रोजनिशीकार व कुशल प्रशासक सॅम्युअल पेपिस यांचे निधन. (जन्म: २३ फेब्रुवारी १६३३)
१९०२: अमेरिकन संशोधक अल्मोन स्ट्राउजर यांचे निधन. (जन्म: ११ फेब्रुवारी १८३९)
१९०८: अहमदिया पंथाचे संस्थापक मिर्झा गुलाम अहमद यांचे निधन. (जन्म: १३ फेब्रुवारी १८३५)
२०००: अर्थतज्ञ व लेखक, मराठी भाषेतील पहिल्या अर्थविषयक नियतकालिकाचे संपादक श्रीपाद वामन काळे यांचे निधन.
२०००: चित्रकार प्रभाकर शिरुर यांचे निधन.