6 June

0
169

६ जून – घटना

१६७४: रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.

१८०८: जोसेफ बोनापार्ते यांना स्पेनचा राजा म्हणून घोषित करण्यात आले.

१८३३: रेल्वेमधून प्रवास करणारे अँड्र्यू जॅक्सन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले.

१८८२: मुंबईत चक्रीवादळ. १,००,००० हून अधिक ठार.

१९३०: गोखले इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सची स्थापना.

१९३३: अमेरिकेत कॅम्डेन, न्यूजर्सी येथे प्रथम ड्राइव्ह इन थिएटर सुरू.

१९४४: ‘डी डे’, दुसऱ्या महायुद्धात मित्रराष्ट्रांनी फ्रान्समधल्या नॉर्मेडी इथल्या जर्मन छावणीवर, एकाच रात्रीत जमीन, समुद्र आणि आकाशतून हल्ला करून हजारो सॆनिक मारले व हजारो कॆद केले.

१९६८: रॉबर्ट एफ. केनेडींचा खून.

१९६९: वि. स. पागे समितीची शिफारस, रोजगार हमी योजनेस सुरुवात.

१९७०: सी. हेेंकेल या ब्रिटिश शास्त्रज्ञाने सर्वप्रथम घरगुती वापरासाठीचा डिटर्जंट साबण विक्रीस उपलब्ध केला.

१९७१: सोव्हिएत संघाने सोयुझ ११ चे प्रक्षेपण केले.

१९७४: स्वीडनने संसदीय राजेशाही स्वीकारली.

१९८२: इस्त्रायलने लेबनॉनवर आक्रमण केले.

१९८४: ऑपरेशन ब्ल्यू स्टार समाप्त. ५७६ ठार, ३३५ जखमी.

१९९३: मंगोलियात सर्वप्रथम राष्ट्राध्यक्षीय निवडणुका.

२००४: भारताच्या राष्ट्रपतींनी तमिळ शास्त्रीय भाषा म्हणून धोषित केली.

६ जून – जन्म

१८५०: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ कार्ल ब्राऊन यांचा जन्म. (मृत्यू: २० एप्रिल १९१८)

१८९१: कन्नड कवी, कथाकार आणि कादंबरीकार मारुती वेंकटेश अय्यंगार यांचा जन्म.

१९०१: इंडोनेशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सुकार्नो यांचा जन्म. (मृत्यू: २१ जुन १९७०)

१९०१: इंडोनेशियाचे पहिले राष्ट्रपती सुकर्णो यांचा जन्म. (मृत्यू: २१ जुन १९७०)

१९०३: भारतीय धर्मगुरू बख्त सिंग यांचा जन्म.

१९०९: अभिनव मराठी ज्ञानकोशकार गणेशरंगो भिडे यांचा जन्म.

१९१९: गीतकार, कवी आणि पटकथालेखक राजेंद्रकृष्ण यांचा जन्म.

१९२९: भारतीय अभिनेता सुनीलदत्त यांचा जन्म. (मृत्यू: २५ मे २००५)

१९३६: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते डी. रामनाडू यांचा जन्म. (मृत्यू: १८ फेब्रुवारी २०१५)

१९४०: भारतीय-इंग्लिश अभियंता आणि शैक्षणिक कुमार भट्टाचार्य, बैरन भट्टाचार्य यांचा जन्म.

१९४३: भारतीय-पाकिस्तानी क्रिकेटर आसिफ इक्बाल यांचा जन्म.

१९५५: भारतीय रंगमंच, दिग्दर्शक आणि रंगमंच शिक्षक सुरेश भारद्वाज यांचा जन्म.

१९५६: स्वीडिश लॉनटेनिस खेळाडू बियॉन बोर्ग यांचा जन्म.

१९७०: भारतीय क्रिकेटपटू सुनील जोशी यांचा जन्म.

१९९१: सुशिल अत्तरदे यांचा जन्म.

६ जून – मृत्यू

१८६१: इटलीचे पहिले पंतप्रधान कॅमिलो बेन्सो यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १८१०)

१८९१: कॅनडाचे पंतप्रधान सरजॉन ए. मॅकडोनाल्ड यांचे निधन. (जन्म: ११ जानेवारी १८१५)

१९४१: शेवरोलेट आणि फ्रंटनॅक मोटर कॉर्पोरेशनचे स्थापक लुईस शेवरोले यांचे निधन. (जन्म: २५ डिसेंबर १८७८)

१९५७: आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ संतरामचंद्र दत्तात्रय तथा गुरूदेव रानडे यांचे निधन. (जन्म: ३ जुलै १८८६)

१९६१: स्विस मानसशास्त्रज्ञ कार्लगुस्टाफ जुंग यांचे निधन.

१९७६: अमेरिकन उद्योगपती जे. पॉल गेटी यांचे निधन. (जन्म: १५ डिसेंबर १८९२)

२००२: मराठी कवयित्री शांता शेळके यांचे निधन. (जन्म: १२ ऑक्टोबर १९२२)