१२ जून – घटना
१८९६: जे.टी. हर्न प्रथम दर्जाच्या क्रिकेट सामन्यात १०० बळी घेणारा पहिला खेळाडू झाला.
१८९८: फिलिपाइन्सने स्पेनपासुन स्वतंत्र असल्याचे घोषित केले.
१९०५: गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची (Servants of India Society) स्थापना केली.
१९१३: जॉन ब्रे या अमेरिकन माणसाची जगातील पहिली कार्टून फिल्म.
१९४०: दुसरे महायुद्ध – १३,००० ब्रिटिश व फ्रेन्च सैनिकांनी मेजर जनरल रोमेल समोर शरणागती पत्करली.
१९४२: अॅन फ्रॅंक यांना तेराव्या वाढदिवसासाठी एक डायरी मिळाली.
१९४४: दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी वापरलेला पहिला फ्लाईंग बॉब लंडनवर आदळला.
१९६४: वर्णद्वेषाविरोधात लढणारे नेते नेल्सन मंडेला यांना आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
१९७५: अलाहाबाद न्यायालयाने इंदिरा गांधींची निवडणूक रद्द ठरवली त्यांना ६ वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी केली.
१९९३: पृथ्वीक्षेपणास्त्राची ११ वी चाचणी यशस्वी.
१९९६: भारतीय पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या संयुक्त आघाडी सरकारने लोकसभेत बहुमत सिद्ध केले.
२००१: कोनेरु हंपी ही बुद्धीबळातील वूमन ग्रॅंडमास्टर बनली. हा पराक्रम करणारी ती भारताची सर्वात कमी वयाची व एकुणात दुसरी खेळाडू आहे.
१२ जून – जन्म
४९९: भारतीय गणिती व खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांचा जन्म.
१८९४: बौद्ध धर्म ग्रंथांचे भाषांतरकार आणि संपादक पुरुषोत्तम बापट यांचा जन्म. (मृत्यू: ४ नोव्हेंबर १९९१)
१९१७: लेखक व पत्रकार भालचंद्र दत्तात्रय खेर यांचा जन्म. (मृत्यू: २१ जून २०१२)
१९२४: अमेरिकेचे ४१ वे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांचा जन्म.
१९२९: जर्मन छळछावणीत मरण पावलेली मुलगी अॅना फ्रँक यांचा जन्म.
१९१७: लेखक पत्रकार भालचंद्र दत्तात्रय खेर यांचा जन्म.
१९५७: पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू प्रशिक्षक जावेद मियाँदाद यांचा जन्म.
१९८५: मोझीला फायरफॉक्स चे सहसंस्थापक ब्लॅक रॉस यांचा जन्म.
१२ जून – मृत्यू
१९६४: मराठी भाषेचे गाढे अभ्यासक कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांचे निधन. (जन्म: ५ जानेवारी १८९२ – इस्लामपूर, सांगली)
१९७८: चिनी भाषेमधील कवी, लेखक आणि इतिहासकार गुओ मोरुओ यांचे निधन.
१९८१: भारताचे ७ वे सरन्यायाधीश प्र. बा. गजेंद्रगडकर यांचे निधन. (जन्म: १६ मार्च १९०१)
१९८३: कॅनेडियन – अमेरिकन अभिनेत्री नॉर्मा शिअरर यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १९०२)
२०००: मराठी लेखक, कवी, नाटककार आणि अभिनेता पु.ल. देशपांडे यांचे निधन. (जन्म: ८ नोव्हेंबर १९१९)
२००३: हॉलीवूड अभिनेता ग्रेगरी पेक यांचे निधन. (जन्म: ५ एप्रिल १९१६)
२०१५: भारतीय मूर्तिकार नेकचंद सैनी यांचे निधन.(जन्म: १५ डिसेंबर १९२४)