14 June

0
149

१४ जुन – घटना

११५८: इसार नदीच्या काठावर म्यूनिच शहर स्थापन केले.

१७०४: मुघलांच्या कैदेत असलेल्या संभाजीराजे यांच्या मुलाचे औरंगजेबाने लग्न लावून दिले.

१७७७: अमेरिकेने स्टार्स अँड स्ट्राइप्स या ध्वजाचा स्वीकार केला.

१७८९: मक्यापासुन पहिल्यांदाच व्हिस्की तयार करण्यात आली. तिला बोर्बोन असे नाव देण्यात आले.

१८९६: महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम ही संस्था स्थापन केली.

१९०७: नॉर्वेत स्त्रियांना मतदानाचा अधिकार.

१९२६: ब्राझील लीग ऑफ नेशन्समधून बाहेर.

१९३८: सुपरमॅनची चित्रपट कथा पहिल्यांदा प्रकाशित.

१९४०: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी पॅरिस जर्मनीच्या हवाली केले.

१९४५: भारताला स्वायत्तता देण्यासंबंधीची वेव्हेल योजना जाहीर.

१९५२: अमेरिकेने अणुशक्तीवर चालणारी पहिली पाणबुडी यू. एस. एस. नॉटिलस बांधण्यास सुरुवात केली.

१९६२: पॅरिसमध्ये युरोपियन अंतराळ संशोधन संस्था स्थापन झाली – नंतर युरोपियन स्पेस एजंसी बनली.

१९६७: मरिनर अंतराळ यान शुक्राकडे प्रक्षेपित.

१९६७: चीनने पहिल्या हायड्रोजन बॉम्ब ची चाचणी केली.

१९७२: डी. डी. टी. या कीटकनाशकाच्या वापरावर अमेरिकेत बंदी घालण्यात आली.

१९९९: दक्षिण आफ्रिकेचे पहिले श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष नोबेल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला यांचा कायर्काळ संपला.

२००१: ए. सी. किंवा डी. सी. यापैकी कोणत्याही विद्युतप्रवाहावर चालणार्‍या उपनगरी गाडीचा (Electric Multiple Unit EMU) शुभारंभ पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक वासुदेव गुप्ता यांच्या हस्ते झाले.

१४ जून – जन्म

१४४४: भारतीय खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ निळकंथा सोमायाजी यांचा जन्म.

१७३६: फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ चार्ल्स कुलोम यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑगस्ट १८०६)

१८६४: जर्मन मेंदुविकारतज्ञ अलॉइस अल्झायमर यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १९१५)

१८६८: नोबेल पारितोषिक विजेते ऑस्ट्रियन जीवशास्त्रज्ञ कार्ल लॅन्ड्स्टायनर यांचा जन्म. (मृत्यू: २६ जून १९४३)

१९६९: प्रसिद्ध जर्मन टेनिस खेळाडू स्टेफी ग्राफ यांचा जन्म.

१९२२: हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक के. आसिफ यांचा जन्म.

१४ जून – मृत्यू

१८२५: वॉशिंग्टन शहराचे रचनाकार फ्रेन्च अमेरिकन वास्तुविशारद आणि स्थापत्य अभियंता पिअर चार्ल्स एल्फांट यांचे निधन. (जन्म: ९ ऑगस्ट १७५४)

१९१६: मराठी नाटककार नाट्यदिग्दर्शक गोविंद बल्लाळ देवल यांचे निधन. (जन्म: १३ नोव्हेंबर १८५५)

१९२०: जर्मन अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ मॅक्स वेबर यांचे निधन. (जन्म: २१ एप्रिल १८६४)

१९४६: ब्रिटिश शास्त्रज्ञ, आद्य दूरचित्रवाणी संशोधक जॉन लोगी बेअर्ड यांचे निधन. (जन्म: १३ ऑगस्ट १८८८)

१९८९: मराठी अभिनेत्री संस्कृत पंडित सुहासिनी मुळगावकर यांचे निधन.

२००७: संयुक्त राष्ट्रांचे चौथे सरचिटणीस कुर्त वाल्ढहाईम यांचे निधन. (जन्म: २१ डिसेंबर १९१८)

२०१०: इंग्रजी लेखक मनोहर माळगावकर यांचे निधन. (जन्म: १२ जुलै १९१३)