18 June

0
189

१८ जून – घटना

१८१५: वॉटर्लूच्या लढाईत नेपोलियनचा दारुण पराभव.

१८३०: फ्रान्सने अल्जीरिया ताब्यात घेतले.

१९०८: फिलीपाइन्स विश्वविद्यालाची (University of the Philippines) ची स्थापना झाली.

१९३०: चीनचा सम्राट डोवागर लोंग्यू याने देशातील सर्व परदेशी व्यक्तींना ठार करण्याचा हुकूम दिला.

१९४६: डॉ. राममनोहर लोहिया यांनी गोव्याच्या मडगाव शहरातून गोवा मुक्तीचे रणशिंग फुंकले.

१९५६: रँग्लर र. पु. परांजपे पुणे विद्यापीठाचे दुसरे कुलगुरू झाले.

१९८१: जनावरांमधे आढळणार्‍या लाळ्या-खुरकुत (Foot and Mouth Disease) रोगावरील पहिली जनुकीय लस विकसित झाली.

१९८३: अंतराळवीर सैली राइड या अंतराळात प्रवास करणाऱ्या पहिल्या अमेरिकन महिला आहेत.

१८ जून – जन्म

१८९९: स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक शंकर त्रिंबक तथा दादा धर्माधिकारी यांचा जन्म. (मृत्यू: १ डिसेंबर १९८५)

१९११: पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ कमला सोहोनी यांचा जन्म. (मृत्यू: ८ सप्टेंबर १९९७)

१९३१: प्रखर राष्ट्रवादी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ५ वे सरसंघचालक के. एस. सुदर्शन यांचा जन्म. (मृत्यू: १५ सप्टेंबर २०१२)

१९४२: दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष थाबो म्बेकी यांचा जन्म.

१९४२: संगीतकार, संगीतसंयोजक, वादक, गीतलेखक, बीटल्स चा सदस्य पॉल मॅकार्टनी यांचा जन्म.

१९६५: सद्दाम हुसेन यांचा मुलगा उदय हुसेन यांचा जन्म. (मृत्यू: २२ जुलै २००३)

१८ जून – मृत्यू

१८५८: झाशीची राणी मणिकर्णिका तांबे ऊर्फ राणी लक्ष्मीबाई इंग्रजांचा पाठलाग टाळण्याच्या प्रयत्‍नात झालेल्या चकमकीत मृत्यूमुखी पडल्या. (जन्म: १९ नोव्हेंबर १८२८)

१९०१: मोचनगड या मराठीतील पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक आणि विविध ज्ञानविस्तार मासिकाचे संपादक रामचंद्र भिकाजी गुंजीकर यांचे निधन. (जन्म: १० एप्रिल १८४३)

१९०२: इंग्लिश लेखक सॅम्युअल बटलर यांचे निधन. (जन्म: ४ डिसेंबर १८३५)

१९३६: रशियन लेखक मॅक्झिम गॉर्की यांचे निधन. (जन्म: २८ मार्च १८६८)

१९५८: इंग्लिश क्रिकेटपटू डग्लस जार्डिन यांचे निधन. (जन्म: २३ ऑक्टोबर १९००)

१९६२: पुण्याच्या विधी महाविद्यालयाचे संस्थापक आणि प्राचार्य जे. आर. तथा नानासाहेब घारपुरे यांचे निधन.

१९७४: स्वातंत्र्यसैनिक, लोकसभेचे हंगामी सभापती, साहित्यिक सेठ गोविंद दास यांचे निधन. (जन्म: १६ ऑक्टोबर १८९६)

१९९९: साहित्यिक, कथा आणि कादंबरीकार श्रीपाद रामकृष्ण काळे यांचे निधन.

२००३: हिन्दी चित्रपटातील चरित्र अभिनेते जानकीदास यांचे निधन.

२००५: भारतीय क्रिकेटपटू मुश्ताक अली यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १९१४)

२००९: मैहर घराण्याचे जागतिक कीर्तीचे सरोदवादक, पद्‌मविभूषण उस्ताद अली अकबर खाँ तथा खाँसाहेब यांचे निधन. (जन्म: १४ एप्रिल १९२२ – शिबपूर, कोमिल्ला, बांगला देश)