२० जून – घटना
१८३७: इंग्लंडच्या राणीपदी व्हिक्टोरिया यजमान झाल्या.
१८४०: सॅम्युअल मोर्स यांना टेलिग्राफ चा पेटंट मिळाला.
१८६३: वेस्ट व्हर्जिनिया अमेरिकेचे ३५ वे राज्य बनले.
१८७७: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनी कॅनडा मध्ये जगातील पहिल्या व्यावसायिक दूरध्वनी सेवेची सुरवात केली.
१८८७: देशातील मुंबई येथील सर्वाधिक गर्दीचे स्टेशन व्हिक्टोरिया टर्मिनस (सध्याचे नाव सी. एस. टी.) सुरू झाले.
१८९९: केंब्रिज विद्यापीठाच्या ट्रायपॉस या गणिताच्या अंतिम परीक्षेत रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे पहिल्या वर्गात पहिले आल्यामुळे त्यांना सिनिअर रॅंग्लर होण्याचा बहुमान मिळाला.
१९२१: टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना झाली.
१९६०: महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची स्थापना झाली.
१९९०: ७.४ मेगावॅटचा भूकंपात इराण मध्ये ५०,००० लोक ठार तर १,५०,००० पर्यंत जखमी झाले.
१९९७: महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे राज्यातील पहिली मुलींची सैनिकी शाळा पुण्याजवळ सुरू झाली.
२००१: परवेझ मुशर्रफ पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष झाले.
२० जून – जन्म
१८६९: किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचा जन्म. (मृत्यू: २६ सप्टेंबर १९५६)
१९१५: चिनी-इंग्लिश दिग्दर्शक आणि पटकथाकार टेरेन्स यंग यांचा जन्म. (मृत्यू: ७ सप्टेंबर १९९४)
१९२०: लोकशाही पद्धतीने निवडण्यात आलेले नेपाळचे पहिले पंतप्रधान, कम्युनिस्ट नेते मनमोहन अधिकारी यांचा जन्म. (मृत्यू: २६ एप्रिल १९९९)
१९३९: जलदगती गोलंदाज व राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष रमाकांत देसाई यांचा जन्म. (मृत्यू: २८ एप्रिल १९९८)
१९४६: पूर्व तिमोरचे राष्ट्राध्यक्ष जनाना गुस्माव यांचा जन्म.
१९४८: नौरूचे राष्ट्राध्यक्ष लुडविग स्कॉटी यांचा जन्म.
१९५२: भारतीय लेखक आणि कवी विक्रम सेठ यांचा जन्म.
१९५४: इंग्लिश क्रिकेटपटू अॅलन लॅम्ब यांचा जन्म.
१९७२: क्रिकेटपटू पारस म्हांब्रे यांचा जन्म.
२० जून – मृत्यू
१६६८: जर्मनीतील संस्कृत विद्वान आणि धर्मप्रसारक हेन्रिच रॉथ यांचे निधन. (जन्म: १८ डिसेंबर १६२०)
१८३७: इंग्लंडचा राजा विल्यम (चौथा) यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट १७६५)
१९१७: अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ जेम्समेसन क्राफ्ट्स यांचे निधन.
१९८७: पद्मभूषण डॉं. सलिम अली यांचे निधन.
१९९७: मराठीतले शायर भाऊसाहेब पाटणकर उर्फ जिंदादिल यांचे निधन.
१९९७: राष्ट्रपती पुरस्कार मिळवणारे निर्माते व दिग्दर्शक बासू भट्टाचार्य यांचे निधन.
२००८: अभिनेते चंद्रकांत गोखले यांचे निधन. (जन्म: ७ जानेवारी १९२१)
२०१३: भारतीय पत्रकार डिकी रुतनागुर यांचे निधन. (जन्म: २६ फेब्रुवारी १९३१)
१९८७: जागतिक कीर्तीचे पक्षीतज्ञ, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे (BNHS) एक संस्थापक डॉ. सलीम अली यांचे निधन. (जन्म: १२ नोव्हेंबर १८९६)