22 June

0
173

२२ जून – घटना

१६३३: गॅलेलिओ गॅलिली याने पोपच्या दबावाखाली पृथ्वी हाच सूर्यमालेचा केंद्रबिंदू आहे असे कबूल केले.

१७५७: प्लासीची लढाई सुरू झाली.

१८९७: पुणे शहरात पसरलेल्या प्लेगच्या साथीच्या काळात झालेल्या जुलुमाचा प्रतिशोध म्हणून चार्ल्स रँड या मुलकी अधिकार्‍याला दामोदर हरी चाफेकर यांनी गोळ्या घालून ठार केले.

१९०८: इंग्लंडचा राजा जॉर्ज (पाचवा) याचे राज्यारोहण.

१९४०: दुसरे महायुद्ध – फ्रान्सने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.

१९४०: नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसमधुन बाहेर पडुन ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली.

१९४१: नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सावरकर सदन येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भेट घेतली.

१९७६: कॅनडाने मृत्यूदंडावर बंदी घातली.

१९७८: जेम्स ख्रिस्ती या खगोलशास्त्रज्ञाने अ‍ॅरिझोना येथील वेधशाळेतून शेरॉन या प्लूटोच्या चंद्राचा शोध लावला.

१९८४: व्हर्जिन अटलांटिक एअरवेजची पहिली उड्डाण लंडन हिथ्रो विमानतळावरून सुरू झाली.

१९८६: अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यादरम्यान १९८६ स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत डिएगो मॅराडोना यांनी विवादास्पद हँड ऑफ गॉड गोल केला.

१९९४: महाराष्ट्र सरकारचे महिलाविषयक धोरण जाहीर झाले. त्याद्वारे सरकारी व निमसरकारी नोकर्‍यात महिलांना ३० टक्‍के आरक्षण.

२००७: अंतराळवीर सुनिता विल्यम यांनी सुमारे १९४ दिवस १८ तास पूर्ण करून सर्वाधिक काळ अंतराळात राहून पृथ्वीवर परत आले.

२२ जून – जन्म

१८०५: इटालियन स्वातंत्र्यवीर जोसेफ मॅझिनी यांचा जन्म. (मृत्यू: १० मार्च १८७२)

१८८७: ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ ज्यूलियन हक्सले यांचा जन्म. (मृत्यू: १४ फेब्रुवारी १९७५)

१८९६: नटश्रेष्ठ बाबुराव पेंढारकर यांचा जन्म.

१८९९: मास्किंग टेप चे शोधक रिचर्ड गिर्ली ड्र्यू यांचा जन्म. (मृत्यू: १४ डिसेंबर १९८०)

१९०८: महानुभाव पंथाचे अभ्यासक, विचारवंत व तत्त्वज्ञ, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विष्णू भिकाजी तथा वि. भि. कोलते यांचा जन्म. (मृत्यू: ९ एप्रिल १९९८)

१९२७: भारतीय-इंग्लिश इतिहासकार आणि शैक्षणिक एन्थोनी लो यांचा जन्म. (मृत्यू: १२ फेब्रुवारी २०१५)

१९३२: आंतरराष्ट्रीय किर्ती प्राप्त केलेले चित्रपट व रंगमंच कलाकार अमरीश पुरी यांचा जन्म. (मृत्यू: १२ जानेवारी २००५ – मुंबई, महाराष्ट्र)

२२ जून – मृत्यू

१९५५: लेगस्पिनर व गुगली गोलंदाज सदाशिव ऊर्फ सदू शिंदे यांचे निधन. (जन्म: १८ ऑगस्ट १९२३)

१९९३: चित्रपट अभिनेते विष्णूपंत जोग यांचे निधन.

१९९४: चित्रपट निर्माते व दिग्दर्शक अक्किनेरी लक्ष्मीवर प्रसाद राव ऊर्फ एल. व्ही. प्रसाद यांचे निधन. (जन्म: १७ जानेवारी १९०८)

२०१४: भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता रामा नारायणन यांचे निधन. (जन्म: ३ एप्रिल १९४९)