4 July

0
167

४ जुलै – घटना

१०५४: वृषभ राशीत क्रॅब नेब्यूला दिसत असल्याचे चिनी लोकांना समजले. नंतर जॉन बेव्हिसने इ. स. १७३१ मधे त्याचे निरीक्षण केल्याची नोंद आहे.

१७७६: अमेरिकेने स्वत:ला इंग्लंडपासून स्वतंत्र्य घोषित केले.

१८२६: अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनाच्या सुवर्णमहोत्सवाच्या दिवशी अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन आणि दुसरे राष्ट्राध्यक्ष जॉन अ‍ॅडॅम्स यांचे निधन झाले.

१८८६: फ्रांसने अमेरिकेला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हे भेट दिले.

१९०३: मोटर रेस स्पर्धे मध्ये भाग घेणारी डॉरोथी लेव्हिट ही पहिली इंग्लिश महिला ठरली.

१९११: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या एकांतवासास प्रारंभ झाला.

१९३६: अमरज्योती हा प्रभातचा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.

१९४६: फिलिपाइन्सला अमेरिकेपासून स्वातंत्र्य मिळाले.

१९४७: भारत पाकिस्तान असे दोन स्वतंत्र देश निर्माण करावेत असा ठराव ब्रिटनच्या संसदेत मांडण्यात आला.

१९९५: टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (TIFR) जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपचे (GMRT) संचालक डॉ. गोविंद स्वरूप यांना एम. पी. बिर्ला पुरस्कार प्रदान केला.

१९९७: नासाचे पाथफाइंडर हे मानवविरहित यान मंगळावर उतरले.

१९९९: लष्कराच्या १८व्या बटालियनने कारगिलमधील द्रासमधील टायगर हिल्स हा महत्त्वाचा टापू घुसखोरांच्या ताब्यातून मुक्त केला.

४ जुलै – जन्म

१७९०: भारताचे सर्वेक्षण करणारे कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट यांचा जन्म. (मृत्यू: १ डिसेंबर १८६६)

१८०७: इटालियन सेनापती व राजकीय नेता जुसेप्पे गॅरीबाल्डी यांचा जन्म. (मृत्यू: २ जून १८८२)

१८७२: अमेरिकेचे ३०वे राष्ट्राध्यक्ष काल्व्हिन कुलिज यांचा जन्म. (मृत्यू: ५ जानेवारी १९३३)

१८८२: एकेडेमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सचे स्थापक लुईस बी. मेयर यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑक्टोबर १९५७)

१८९८: भारताचे दुसरे पंतप्रधान गुलझारीलाल नंदा यांचा जन्म. (मृत्यू: १५ जानेवारी १९९८)

१८९७: भारतीय कार्यकर्ते अलारी सीताराम राजू यांचा जन्म. (मृत्यू: ७ मे १९२४)

१९१२: जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक पं. निवृत्तीबुवा सरनाईक यांचा जन्म. (मृत्यू: १६ फेब्रुवारी १९९४)

१९१४: जनकवी भावगीत लेखक पी. सावळाराम यांचा जन्म. (मृत्यू: २१ डिसेंबर १९९७)

१९२६: विनोदी साहित्यिक विनायक आदिनाथ तथा वि. आ. बुवा यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल २०११)

१९७६: जपानी मोटरसायकल रेसर दाइजिरो कातो यांचा जन्म. (मृत्यू: २० एप्रिल २००३)

१९८३: भारतीय-इंग्लिश पत्रकार अमोल राजन यांचा जन्म.

४ जुलै – मृत्यू

१७२९: मराठा आरमारप्रमुख (सेना सरखेल) कान्होजी आंग्रे यांचे निधन.

१८२६: अमेरिकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष जॉन अ‍ॅडॅम्स यांचे निधन. (जन्म: ३० ऑक्टोबर १७३५)

१८३१: अमेरिकेचे पाचवे राष्ट्राध्यक्ष जेम्स मोन्रो यांचे निधन. (जन्म: २८ एप्रिल १७५८)

१९०२: भारतीय तत्त्वज्ञानाचा जगभर प्रसार करणारे रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १८६३)

१९३४: नोबेल पारितोषिक विजेत्या पोलिश-फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ मेरी क्युरी यांचे निधन. (जन्म: ७ ऑक्टोबर १८६७)

१९६३: भारतीय तिरंग्याचे रचनाकार पिंगाली वेंकय्या यांचे निधन. (जन्म: २ ऑगस्ट १८७६)

१९८०: रसाळ लेखन करणारे कादंबरीकार रघुनाथ वामन दिघे यांचे निधन. (जन्म: २४ एप्रिल १८९६)

१९८२: भक्तिप्रधान, पौराणिक चित्रपटांचे गीतकार भरत व्यास यांचे निधन.

१९९९: विनोदसम्राट, कलागौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार व बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित वसंत शिंदे यांचे निधन. (जन्म: १४ मे १९०९)