7 July

0
165

७ जुलै – घटना

१४५६: मृत्यूच्या २५ वर्षांनंतर जोन ऑफ आर्कला निर्दोष ठरवले.

१५४३: फ्रेन्च सैन्याने लक्झेंबर्गचा ताबा घेतला.

१७९९: रणजितसिंहच्या सैन्याने लाहोरला वेढा घातला.

१८५४: कावसजीदावर यांनी मुंबईत कापड गिरणी सुरू केली.

१८९६: मुंबईच्या फोर्ट भागातील एस्प्लनेड मॅन्शन या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील वॉटसन हॉटेलमध्ये ऑगस्ते लुई या ल्युनिअर बंधूंनी भारतात पहिल्यांदाच चित्रपट दाखवला.

१८९८: हवाई बेटांनी अमेरिकेचे सार्वभौमत्व मान्य केले.

१९१०: पुणे येथे भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना.

१९४१: दुसरे महायुद्ध – अमेरिकन सैन्याचे आइसलँडमधे आगमन झाले.

१९७८: सॉलोमन बेटांना इंग्लंडकडून स्वातंत्र्य मिळाले.

१९८५: विम्बल्डन पुरूष एकेरीचे विजेतेपद १७ व्या वर्षी मिळवणारा बोरिस बेकर हा सर्वात तरुण खेळाडू बनला.

१९९८: इन्डिपेन्डन्स चषक तिरंगी क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेविरुद्ध खेळताना सचिन तेंडुलकरने वेस्ट इंडिजच्या डेसमंड हेन्सच्या एकदिवसीय सामन्यातील १७ शतकांची बरोबरी केली. तसेच एकदिवसीय सामन्यातील ७००० धावांचा टप्पा पार केला.

७ जुलै – जन्म

१०५३: जपानी सम्राट शिराकावा यांचा जन्म. (मृत्यू: २४ जुलै ११२९)

१६५६: शीख धर्माचे आठवे गुरु गुरू हर क्रिशन यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट १६६४)

१८४८: ब्राझीलचा राष्ट्राध्यक्ष फ्रान्सिस्को दि पॉला रॉद्रिगेस आल्वेस यांचा जन्म.

१९१४: प्रतिभासंपन्न संगीतकार अनिल बिस्वास यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मे २००३)

१९२३: कथाकार, कादंबरीकार आणि समीक्षक प्रा.लक्ष्मण गणेश जोग यांचा जन्म.

१९४७: नेपाळ नरेश राजेग्यानेंद्र यांचा जन्म.

१९४८: चित्रपट रंगभूमीवरील अभिनेत्री पद्मा चव्हाण यांचा जन्म. (मृत्यू: १२ सप्टेंबर १९९६)

१९६२: गायिका पद्म जाफेणाणी यांचा जन्म.

१९७०: भारतीय क्रिकेटपटू मिस्टर पटेल यांचा जन्म.

१९७३: भारतीय गायक-गीतकार आणि दिग्दर्शक कैलाश खेर यांचा जन्म.

१९८१: भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांचा जन्म.

७ जुलै – मृत्यू

१३०७: इंग्लंडचा राजा एडवर्ड पहिला यांचे निधन. (जन्म: १७ जून १२३९)

१५७२: पोलंडचा राजा सिगिस्मंड दुसरा ऑस्टस यांचे निधन.

१९३०: स्कॉटिश डॉक्टर शेरलॉक होम्स या गुप्तहेर कथांचे लेखक सर आर्थर कॉनन डॉइल यांचे निधन. (जन्म: २२ मे १८५९)

१९६५: इस्रायलचे दुसरे पंतप्रधान मोशे शॅरेट यांचे निधन.

१९८२: भारतीय गुरू आणि धार्मिक लेखक बॉन महाराजा यांचे निधन. (जन्म: २३ मार्च १९०१)

१९९९: भारतीय क्रिकेट खेळाडू एम. एल. जयसिंहा यांचे निधन.