१५ जुलै – घटना
१६६२: इंग्लंडमध्ये प्रतिष्ठित असलेल्या रॉयल सोसायटीची स्थापना झाली.
१६७४: मुघल सरदार बहादूरशहा कोकलताशच्या ताब्यातील पेडगावाची सुमारे कोटीची लूट रायगडावर जमा झाली.
१९२६: मुंबईतील कुलाबा ते क्रॉफर्ड मार्केट उपनगरी बस सेवा सुरू झाली.
१९२७: र. धों. कर्वे यांच्या समाजस्वास्थ्य मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
१९५५: आण्विक अस्त्रांवर बंदी घालणाऱ्या मैनाऊ जाहीरनाम्यावर ५८ नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांच्या स्वाक्षऱ्या.
१९५५: पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारतरत्न सन्मान जाहीर.
१९६२: ज्ञानप्रबोधिनी संस्थेचा पुणे येथे प्रारंभ.
१९९६: पांडुरंग शास्त्री आठवले यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
१९९७: पर्यावरणवादी महेशचंद्र मेहता यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
२००६: ट्विटर हा सर्वात मोठा सोशिअल प्लॅटफॉर्म सुरु झाला.
१५ जुलै – जन्म
१६०६: डच चित्रकार रेंब्राँ यांचा जन्म. (मृत्यू: ४ ऑक्टोबर १६६९)
१६११: जयपूर चे राजे मिर्झाराजे जयसिंग यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑगस्ट १६६७)
१९०३: खासदार आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. कामराज यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑक्टोबर १९७५)
१९०४: जयपूर – अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर यांचा जन्म. (मृत्यू: १० फेब्रुवारी २००१)
१९०५: पाकिस्तानचे ४थे पंतप्रधान चौधरी मुहंमद अली यांचा जन्म. (मृत्यू: २ डिसेंबर १९८०)
१९१७: अफगणिस्तानचे ३रे राष्ट्राध्यक्ष नूरमोहंमद तराकी यांचा जन्म. (मृत्यू: १४ सप्टेंबर १९७९)
१९२७: विचारवंत, वक्ते व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. शिवाजीराव भोसले यांचा जन्म. (मृत्यू: २९ जून २०१०)
१९३२: विद्वान, टीकाकार आणि लेखक नरहर कुरुंदकर यांचा जन्म. (मृत्यू: १० फेब्रुवारी १९८२)
१९३३: भारतीय लेखक आणि पटकथालेखक एम. टी. वासुदेवन नायर यांचा जन्म.
१९३७: भारतीय पत्रकार श्री प्रभाज जोशी यांचा जन्म. (मृत्यू: ५ नोव्हेंबर २००९)
१९४९: दलित साहित्यिक माधव कोंडविलकर यांचा जन्म.
१५ जुलै – मृत्यू
१२९१: जर्मनीचा राजा रुडॉल्फ (पहिला) यांचे निधन. (जन्म: १ मे १२१८)
१५४२: लिओनार्डो दा विंची यांच्या पेंटिंग मोना लिसा मधील महिला लिसा डेल जिकॉन्डो यांचे निधन. (जन्म: १५ जून १४७९)
१९०४: रशियन कथाकार व नाटककार अंतॉन चेकॉव्ह यांचे निधन. (जन्म: २९ जानेवारी १८६०)
१९१९: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ हर्मान एमिल फिशर यांचे निधन. (जन्म: ९ ऑक्टोबर १८५२)
१९५३: ऑर्डर ऑफ दी इमिटेशन ऑफ क्राइस्ट चे संस्थापक भारतीय आर्चबिशप गिवरगीस मार इव्हानिओस यांचे निधन. (जन्म: २१ सप्टेंबर १८८२)
१९६७: गायक व नट नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्व यांचे निधन. (जन्म: २६ जून १८८८)
१९७९: मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावोदियाझ ओर्दाझ यांचे निधन.
१९९१: जनसंघ व भाजपचे नेते, गोवा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, वक्ते जगन्नाथराव जोशी यांचे निधन.
१९९८: स्वातंत्र्यसैनिक ताराचंद परमार यांचे निधन.
१९९९: पर्यावरणवादी लेखक जगदीश गोडबोले यांचे निधन.
१९९९: सामाजिक कार्यकर्त्या इंदुताई टिळक यांचे निधन.
२००४: कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रात सलग साठ वर्षे कार्य करणाऱ्या सामाजिक डॉ. बानू कोयाजी यांचे निधन. (जन्म: २२ ऑगस्ट १९१८)