27 July

0
175

२७ जुलै – घटना

१७६१: माधवराव बल्लाळ भट ऊर्फ थोरले माधवराव हे मराठा साम्राज्यातील ४थे पेशवे बनले.

१८६६: आयर्लंडच्या व्हॅलेन्शिया द्वीपापासून कॅनडातील ट्रिनिटी बेपर्यंत समुद्राखालील तार घालण्याचे काम पूर्ण. युरोप अमेरिकेच्या दरम्यान तारसंदेश पाठवणे शक्य झाले.

१८९०: डच चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गॉगने स्वत:वर गोळी झाडून घेतली. दोन दिवसांनी त्याचे निधन झाले.

१९२१: टोरँटो विद्यापीठातील सर फ्रेड्रिक बँटिंग आणि चार्ल्स बेस्ट इन्सुलिन शुद्ध स्वरूपात विभक्त करण्यात यश मिळवले.

१९४०: अॅनिमेट शॉर्ट फिल्म ए जंगली हेअर मधून बग्स बनी हे पात्र प्रकाशित झाले.

१९४९: पहिल्या प्रवासी जेट विमान, डी हॅविललँड कॉमेटचे पहिले उड्डाण.

१९५५: दोस्त राष्ट्रांनी ऑस्ट्रियातुन आपले सैन्य काढुन घेतले.

१९८३: कोलंबो येथील वेलिकाडा तुरुंगात सिंहली कैद्यांनी १८ तामिळ राजकीय कैद्यांची हत्या केली.

१९९७: द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणा निधी यांची सलग सातव्यांदा पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली. हा एक विक्रम आहे.

१९९९: द्रवखनिज तेलवायूचा (LPG) वाहनांसाठी इंधन म्हणून वापर करण्याचा प्रस्ताव पेट्रोलियम मंत्रालयाने मंजूर केला.

२००१: सार्वजनिक ठिकाणे, शासकीय इमारती, या ठिकाणी सिगारेट, तंबाखू, गुटखा सेवन या वस्तूंची सार्वजनिक ठिकाणी जाहिरात करण्यावर बंदी घालण्याचा महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा निर्णय.

२०१२: लंडन येथे ३०व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

२७ जुलै – जन्म

१६६७: स्विस गणितज्ञ योहान बर्नोली यांचा जन्म. (मृत्यू: १ जानेवारी १७४८)

१८९९: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू पर्सी हॉर्नी ब्रूक यांचा जन्म.

१९११: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ डॉ. पां. वा. सुखात्मे यांचा जन्म. (मृत्यू: २८ जानेवारी १९९७)

१९१५: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू जॅक आयव्हरसन यांचा जन्म.

१९५४: भारतीय वकील आणि राजकारणी जी.एस. बाली यांचा जन्म.

१९५५: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अ‍ॅलन बॉर्डर यांचा जन्म.

१९६३: पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू नवेद अंजुम यांचा जन्म.

१९६७: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, आणि पटकथालेखक राहुल बोस यांचा जन्म.

१९८३: भारतीय फुटबॉल खेळाडू सॉकर वेल्हो यांचा जन्म.

२७ जुलै – मृत्यू

१८४४: इंग्लिश भौतिक रसायनशास्त्रज्ञ जॉन डाल्टन यांचे निधन. (जन्म: ६ सप्टेंबर १७६६)

१८९५: किराणा घराण्याचे प्रवर्तक, रूद्र वीणाचे मधुर वादन उस्ताद बंदे अली खाँ बीनकार यांचे निधन.

१९७५: गांधीवादी नेते, खासदार, भारतीय राज्यघटनेचे मराठीत भाषांतर केले मामासाहेब देवगिरीकर यांचे निधन.

१९८०: शाह ऑफ इराण मोहम्मद रझा पेहलवी यांचे निधन. (जन्म: २६ ऑक्टोबर १९१९)

१९९२: हिन्दी चित्रपट अभिनेते अमजद खान यांचे निधन. (जन्म: १२ नोव्हेंबर १९४० – गझनी, अफगाणिस्तान)

१९९७: हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते बळवंत लक्ष्मण वष्ट यांचे निधन.

२००२: भारताचे १०वे उपराष्ट्रपती कृष्णकांत यांचे निधन. (जन्म: २८ फेब्रुवारी १९२७)

२००७: स्फोटके व शस्त्रास्त्र तज्ञ वामन दत्तात्रय पटवर्धन यांचे निधन. (जन्म: ३० जानेवारी १९१७)

२०१५: भारताचे ११ वे राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे निधन. (जन्म: १५ ऑक्टोबर १९३१)