११ ऑगस्ट – घटना
ख्रिस्त पूर्व ३११४: मेसोअमेरिकन लॉन्ग कॅलेंडर सुरु झाले.
१८७७: अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ हॉल यांनी मंगळाच्या फोबॉस व डिमॉस या चंद्रांचा शोध लावला.
१९४३: सी. डी. देशमुख हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया चे पहिले भारतीय गव्हर्नर झाले.
१९५२: हुसेन बिन तलाल जॉर्डनचे राजे बनले.
१९६०: चाड देशाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले.
१९६१: दादरा व नगर हवेली हा भाग भारताचा केन्द्रशासित प्रदेश बनला.
१९७९: गुजरात मोर्वी येथे धरण फुटून हजारो लोक मृत्यूमुखी पडले.
१९८७: युनायटेड स्टेट्स फेडरल रिझर्व्ह च्या अध्यक्षपदी अॅलन ग्रीनस्पॅन यांची निवड झाली.
१९९४: अफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व डॉ. नेल्सन मंडेला यांच्या निकटवर्ती सहकारी डॉ. फातिमा मीर यांना विश्वगुर्जरी पुरस्कार जाहीर.
१९९९: बारा वर्षाखालील मुलांच्या राज्यस्तरीय जलद बुद्धीबळ स्पर्धेत नवी दिल्ली येथील सहा वर्षे वयाच्या परिमार्जन नेगी याने विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा जिंकणारा सर्वात छोटा खेळाडू ठरला.
१९९९: शतकातील शेवटचे खग्रास सूर्यग्रहण झाले.
२०१३: डॉ. सुब्रम्हण्यम स्वामी यांच्या जनता पक्षाचे भारतीय जनता पक्षात विलीनीकरण झाले.
११ ऑगस्ट – जन्म
१८९७: बालसाहित्यीक इंग्लिश लेखिका एनिड ब्लायटन यांचा जन्म. (मृत्यू: २८ नोव्हेंबर १९६८)
१९११: पत्रकार, संपादक, राजकीय विश्लेषक प्रेम भाटिया यांचा जन्म. (मृत्यू: ८ मे १९९५)
१९२८: लेखक व पत्रकार विनायक सदाशिव तथा वि. स. वाळिंबे यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी २०००)
१९२८: संगीतकार, वादक व शास्त्रीय संगीतातील विद्वान रामाश्रेय झा यांचा जन्म. (मृत्यू: १ जानेवारी २००९)
१९४३: पाकिस्तानचे १० वे राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांचा जन्म.
१९४४: फेडएक्स चे संस्थापक फ्रेडरिक स्मिथ यांचा जन्म.
१९५०: ऍपल इन्क कंपनीचे सहसंस्थापक स्टीव्ह वोजनियाक यांचा जन्म.
१९५४: क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचा जन्म.
११ ऑगस्ट – मृत्यू
१९०८: क्रांतिकारक खुदिराम बोस यांचे निधन. (जन्म: ३ डिसेंबर १८८९)
१९७०: साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञ इरावती कर्वे यांचे निधन. (जन्म: १५ डिसेंबर १९०५)
१९९९: क्रिकेटपटू रामनाथ पारकर यांचे निधन. (जन्म: ३१ ऑक्टोबर १९४६)
२०००: दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते अभिनेते पी. जयराज यांचे निधन. (जन्म: २८ सप्टेंबर १९०९)
२००३: स्विस गणितज्ञ अर्मांड बोरेल यांचे निधन. (जन्म: २१ मे १९२३)
२०१३: भारतीय पक्षीशास्त्रज्ञ आणि लेखक जफर फटहॅली यांचे निधन. (जन्म: १९ मार्च १९२०)