२० ऑगस्ट – घटना
१६६६ शिवाजीराजांनी दख्खनेमधे येण्यासाठी नरवीर घाटी हे ठाणे खोटे दस्तऐवज दाखवून ओलांडले.
१८२८: राजाराममोहन रॉय, द्वारकानाथ टागोर, कालिनाथ रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली.
१८९७: सर रोनाल्ड रॉस यांनी भारतात हिवतापाच्या जिवाणूचा शोध लावला.
१९१४: पहिले महायुद्ध – जर्मन फौजांनी ब्रुसेल्स शहराचा ताबा घेतला.
१९२०: डेट्रॉइट,मिशिगन येथे जगातील पहिले व्यावसायिक नभोवाणी केंद्र 8MK (सध्याचे WWJ) सुरू झाले.
१९४१: दुसरे महायुद्ध – फ्रान्समधील भुमिगत चळवळ उखडून काढण्याच्या उद्देशाने जर्मनांनी एका दिवसात ५० हजार नागरिकांना अटक केली
१९६०: सेनेगलने आपण मालीपासून स्वतंत्र असल्याचे जाहीर केले.
१९८८: ८ वर्षांच्या युद्धानंतर इराण-इराक युद्धबंदी करार झाला.
१९९५: भारतातील फिरोजाबाद रेल्वे अपघातात २५८ जणांचा मृत्यू झाला.
२००८: कुस्तीगीर सुशील कुमारला बीजिंग ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ पदक मिळाले.
२० ऑगस्ट – जन्म
१७७९: स्वीडीश रसायनशास्त्रज्ञ जेकब बर्झेलिअस यांचा जन्म. (मृत्यू: ७ ऑगस्ट १८४८)
१८३३: अमेरिकेचे ३३वे राष्ट्राध्यक्ष बेंजामिन हॅरिसन यांचा जन्म. (मृत्यू: १३ मार्च १९०१)
१८९६: भारतीय फुटबॉल खेळाडू गोस्त पाल यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १९७६)
१९४०: भारतीय-ऑस्ट्रेलियन क्रिकेटर रेक्स सेलर्स यांचा जन्म.
१९४१: युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष स्लोबोदान मिलोसोव्हिच सर्बिया यांचा जन्म. (मृत्यू: ११ मार्च २००६)
१९४४: भारताचे ६वे व सर्वात कमी वयाचे पंतप्रधान राजीव गांधी यांचा मुंबई येथे जन्म. (मृत्यू: २१ मे १९९१)
१९४६: इन्फोसिस चे सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांचा जन्म.
२० ऑगस्ट – मृत्यू
१९३९: भारतीय इंग्रजी खगोलशास्त्रज्ञ व लेखक एग्नेस गिबर्ने यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १८४५)
१९८४: सुप्रसिद्ध जादूगार रघुवीर भोपळे यांचे निधन. (जन्म: २४ मे १९२४)
१९८५: अकाली दलाचे अध्यक्ष हरचंदसिंग लोंगोवाल यांचे निधन. (जन्म: २ जानेवारी १९३२)
१९८८: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व संकलक माधवराव शिंदे यांचे निधन.
१९९७: गुजराथी नाटककार लेखक प्रागजी डोस्सा यांचे निधन. (जन्म: ७ ऑक्टोबर १९०७)
२०००: चित्रपट निर्माते प्राणलाल मेहता यांचे निधन.
२००१: प्राच्यविद्येचे गाढे अभ्यासक, केंद्रीय वित्त सचिव, भारतीय विद्या भवनच्या पुणे केंद्राचे अध्यक्ष एम. आर. यार्दी यांचे निधन.
२०११: भारतीय इतिहासकार आणि शैक्षणिक राम शरण शर्मा यांचे निधन. (जन्म: २६ नोव्हेंबर १९१९)
२०१३: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, थोर समाजवादी विचारवंत साधना साप्ताहिकाचे संपादक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे निधन.
२०१३: ज्योतिर्भास्कर, लेखक उद्योजक जयंत साळगावकर यांचे निधन. (जन्म: १ फेब्रुवारी १९२९)
२०१४: भारतीय योग प्रशिक्षक व लेखक तसेच आयंगर योगा चे निर्माते बी. के. अय्यंगार यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १९१८)