26 August

0
177

२६ ऑगस्ट – घटना

१३०३: अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडगड जिंकले.

१४९८: मायकेल अँजेलो याने पिएटा या जगप्रसिद्ध शिल्पकृतीच्या कामास सुरूवात केली.

१७६८: कॅप्टन जेम्स कूक पहिल्या सफरीवर निघाले.

१७९१: जॉन फिच यांना स्टीमबोट साठी अमेरिकेचे पेटंट देण्यात आले.

१८८३: सध्याचे इंडोनेशिया बेटावरील क्राकाटाऊ ज्वालामुखीच्या उद्रेकात १३६ गावे उध्वस्त ३६,००० लोकांचा बळी.

१९४४: दुसरे महायुद्ध – चार्ल्स गॉलने पॅरिसमधे प्रवेश केला.

१९७२: जर्मनीतील म्युनिच येथे २०व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात.

१९९४: लोन टेनिसपटू रमेश कृष्णन आणि मध्यम पल्ल्याचा धावपटू बहादूर प्रसाद यांना के. के. बिर्ला फांउंडेशनचा पुरस्कार जाहीर.

१९९६: दक्षिण कोरियात १९७९ मध्ये झालेल्या लष्करी कटाबद्दल माजी अध्यक्ष चुन दू वान यांना मृत्यूदंडाची तर त्यांचे उत्तराधिकारी प्रो ताय वू यांना साडेबावीस वर्षे कारावासाची शिक्षा.

२६ ऑगस्ट – जन्म

१७४०: हॉट एअर बलून चे शोधक जोसेफ-मायकेल मॉन्टगॉल्फ़र यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑक्टोबर १८१०)

१७४३: आधुनिक रसायनशास्त्राचा जनक अ‍ॅन्टॉइन लॅव्हाझियर यांचा जन्म. (मृत्यू: ८ मे १७९४)

१९१०: भारतरत्न तसेच नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांचा जन्म. (मृत्यू: ५ सप्टेंबर १९९७)

१९२२: समाजवादी विचारवंत, शिक्षणतज्ञ, राजकारणी, लेखक, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ग. प्र. प्रधान यांचा जन्म. (मृत्यू: २९ मे २०१०)

१९२७: प्रख्यात वास्तुविशारद बी. व्ही. दोशी यांचा जन्म.

१९२८: हिरो साइकिलचे सहसंस्थापक ओम प्रकाश मंजाल यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट २०१५)

१९४४: लेखक सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचा जन्म.

२६ ऑगस्ट – मृत्यू

१७२३: डच सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ अँथनी व्हॉन लीवेनहॉक यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर १६३२)

१९४८: नाटककार तसेच नवाकाळ वृत्तपत्राचे संस्थापक कृष्णाजी खाडिलकर यांचे निधन. (जन्म: २५ नोव्हेंबर १८७२)

१९५५: मुंबई मराठी साहित्य संघाचे संस्थापक अ. ना. भालेराव यांचे निधन.

१९५५: मल्याळी चित्रपट अभिनेते बालन के. नायर यांचे निधन.

१९७४: पॅरिस ते न्यूयॉर्क ही ५,८०० कि.मी. विनाथांबा विमानोड्डाण स्पर्धा साडे ३३ तासात जिंकणारा वैमानिक चार्ल्स ऑगस्टस लिंडबर्ग यांचे निधन. (जन्म: ४ फेब्रुवारी १९०२)

१९९९: डेव्हिस करंडक लॉन टेनिसपटू नरेन्द्रनाथ यांचे निधन.

२०१२: चित्रपट अभिनेते स्वातंत्र्यसैनिक ए. के. हनगल यांचेनिधन. (जन्म: १ फेब्रुवारी १९१७)