१२ सप्टेंबर – घटना
१६६६: आग्ऱ्याहून सुटका, शिवाजी महाराज राजगड येथे सुखरूप पोहोचले.
१८५७: कॅलिफोर्निया गोल्ड रश मध्ये सापडलेले १३-१५ टन सोने घेऊन जाणारे एस.एस. सेंट्रल अमेरिका हे जहाज सोने व ४२६ प्रवाशांसह बुडाले.
१८९७: तिरह मोहिम: सारगढीची लढाई.
१९१९: अॅडॉल्फ हिटलर यांनी जर्मन वर्कर्स पार्टी मध्ये प्रवेश केला.
१९३०: विल्फ्रेड र्होड्स यांनी आपला शेवटचा म्हणजे १११० वा प्रथमश्रेणी क्रिकेट सामना खेळला.
१९४८: भारतीय सैन्य हैदराबाद संस्थानच्या हद्दीत शिरले. हैदराबाद मुक्तिसंग्रामास पोलिस अॅक्शन असे म्हटले जाते.
१९५९: ल्युना-२ हे मानवविरहित रशियन यान चंद्रावर उतरले.
१९८०: तुर्कस्तानमध्ये लष्करी उठाव.
१९९८: डॉ. जयंत नारळीकर यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान.
२००२: मेटसॅट या भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण.
२००५: हाँगकाँगमधील डिस्नेलँड सुरू झाले.
२०११: न्यूयॉर्क शहरातील ९/११ मधील स्मारक संग्रहालय सर्वांसाठी सुरु झाले.
१२ सप्टेंबर – जन्म
१४९४: फ्रान्सचा राजा फ्रान्सिस पहिला यांचा जन्म.
१६८३: पोर्तुगालचा राजा अफोन्सो सहावा यांचा जन्म.
१७९१: विद्युतशक्तीचे शास्रज्ञ मायकल फॅरेडे यांचा इंग्लंड येथे जन्म.
१८१८: गॅटलिंग गन चे संशोधक रिचर्ड जॉर्डन गॅटलिंग यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १८०३)
१८९४: जागतिक ख्यातीचे बंगाली साहित्यिक विभूतिभूषण बंदोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: १ नोव्हेंबर १९५०)
१८९७: नोबेल पारितोषिक विजेत्या फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आयरिन क्युरी यांचा जन्म. (मृत्यू: १७ मार्च १९५६)
१९१२: इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी फिरोझ गांधी यांचा जन्म. (मृत्यू: ८ सप्टेंबर १९६०)
१९४८: ऑस्ट्रेलियन क्रिकेट आणि फुटबॉलपटू मॅक्स वॉकरयांचा जन्म.
१९७७: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू नेथन ब्रॅकेन यांचा जन्म.
१२ सप्टेंबर – मृत्यू
१९१८: ऑस्ट्रेलियाचे चौथे पंतप्रधान जॉर्ज रीड यांचे निधन.
१९२६: मराठी साहित्य संशोधक, ग्रंथकार विनायक लक्ष्मण भावे यांचे निधन.
१९५२: शास्त्रीय गायक रामचंद्र कुंदगोळकर तथा सवाई गंधर्व यांचेनिधन. (जन्म: १९ जानेवारी १८८६)
१९७१: शंकर-जयकिशन या संगीतकार जोडीतील संगीतकार जयकिशन डाह्याभाई पांचाळ यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १९२९)
१९८०: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते सतीश दुभाषी यांचे निधन. (जन्म: १४ डिसेंबर १९३९)
१९८०: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री शांता जोग यांचे निधन. (जन्म: २ मार्च १९२५)
१९९२: हिंदुस्तानी शास्त्रीय गायक पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांचे निधन. (जन्म: ३१ डिसेंबर १९१०)
१९९३: अमेरिकन अभिनेता रेमंड बर यांचे निधन.
१९९६: संगीत नाट्य सृष्टीतील गायक अभिनेते पं. कृष्णराव चोणकर यांचेनिधन.
१९९६: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री पद्मा चव्हाण यांचे निधन. (जन्म: ७ जुलै १९४८)